तुम्ही करतात ते पुण्य? आम्ही केलं ते पाप? 'क्वीन नेकलेस'वरून भाजपचा शिवसेनेवर निशाणा

तुम्ही करतात ते पुण्य? आम्ही केलं ते पाप? 'क्वीन नेकलेस'वरून भाजपचा शिवसेनेवर निशाणा

अखेर झाले काय? तर शोभा वाढलीच! पण..आता क्वीन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर: केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोठी सरकारनं वीज बचत व्हावी व पर्यावरण पूरक म्हणून मुंबईत एलईडी दिवे लावण्यास सुरुवात केली, तेव्हा क्वीन नेकलेसची (Queen Necklace)शोभा जाईल, अशी ओरड करण्यात आली होती. हे जे ओरडत होते त्यांनी क्वीन नेकलेसच आता तोडला त्याचे काय? असा सवाल करीत हा दुटप्पीपणा, ढोंगीपणा असल्याचा आरोप भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार (bjp Mla Ashish Shelar) यांनी केला आहे. आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरणपूरक दिवे लावले ते पाप? असा खोचक सवाल देखील आशिष शेलार यांनी शिवसेनेला केला आहे.

हेही वाचा...राष्ट्रवादीच्या आमदारानं शिपाईच्या पोटात मारली लाथ, अदखलपात्र गुन्हा दाखल

आमदार अॅड.आशिष शेलार यांनी ट्वीट करत शिवसेनेवर मुंबईतील क्वीन नेकलेस प्रकरणी निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या पुढाकाराने पर्यावरण पूरक एलईडी दिवे मुंबईत लावले गेले तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्विन नेकलेसची शोभा जाईल, म्हणून केव्हढा थयथयाट केला.

अखेर झाले काय? तर शोभा वाढलीच! पण..आता क्वीन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत. क्वीन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय? आता पारसी गेट तोडलाच...समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार, अशी जहरी टीका अशिष शेलार यांनी केली आहे. आता या परिसराची शोभा घालवली जाणार आहे.

आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरणपूरक दिवे लावले ते पाप? असा सवाल देखील आशिष शेलार यांनी केली आहे. झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड? मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या "ढोंगीपणाचा गाळ" दिसला ना अशा सूचक शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

आमदार आशिष शेलार यांचं ट्वीट...

कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर...

दरम्यान, या आधीही आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर घणाघाती आरोप केला होता. बांधकाम प्रकल्पांना आकारण्यात येणारा प्रिमियम कमी करण्यावर राज्य सरकार विचाराधीन आहे. मात्र, त्यावरू भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. राज्यात कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर, अशा सूचक शब्दांत निशाणा साधला आहे.

प्रिमियममधून महापालिकांना उत्पन्न मिळते. मात्र राज्य शासनाने मुंबई, ठाणे, पुणे या शहरातील बांधकाम प्रकल्पांचा प्रिमियम कमी करण्याबाबत पारेख कमिटी गठीत केली आहे. प्रिमियम कमी करणे कुणासाठी सुरू आहे? असा सवाल करीत आमदार आशिष शेलार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मुंबई, ठाणे, पुणे शहरातील बिल्डरांसाठी राज्य शासन प्रिमीयम कमी करण्याचा घाट घालत आहे. त्यासाठी पारेख कमिटी गठीत करण्यात आली आहे.

हेही वाचा...शिक्षणमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, परीक्षेबाबत दिली महत्त्वपूर्ण माहिती

पण, प्रिमियम कमी केल्याने महापालिकांचे उत्पन्न घटणार त्याचे काय? सर्वसामान्यांसाठी घराच्या किंमती कमी होणार का?त्या किती कमी होणार? रेडिरेकनरची फाईल जशी पुणे-मुंबई प्रवासात "लक्ष्मी दर्शन" करीत आली तशीच ही फाईल मंत्रालयातून कुठल्या कुठल्या "बंगल्यावर लक्ष्मीदर्शन" करीत फिरतेय? शेतकरी, श्रमिकांच्या प्रश्नांपेक्षा बिल्डरांच्या विषयात सरकारला अधिक रस का? राज्यात कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर? अशा सूचक शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 19, 2020, 2:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading