World No-Tobacco Day : कोरोना लॉकडाऊनमुळे भारतीयांची तंबाखूच्या व्यसनातून मुक्ती

World No-Tobacco Day : कोरोना लॉकडाऊनमुळे भारतीयांची तंबाखूच्या व्यसनातून मुक्ती

एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात 18 ते 69 वयोगटातील 66 टक्के भारतीयांनी धूम्रपान सोडल्याचं एका सर्वेक्षणात दिसून आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मे : तंबाखूसारखं (tobacco) व्यसन असणाऱ्यांसाठी लॉकडाऊनचा (lockdown हा कालावधी अतिशय कठीण असला तरी संधीचे सोने साधून अशा व्यसनातून मुक्ती नक्कीच मिळू शकते. मनाची तयारी आणि औषधोपचारांनी तुम्ही या व्यसनांपासून कायमचे लांब राहू शकता. म्हणूनच लॉकडाऊनचा हा कालावधी व्यसनाधीन व्यक्तींकरिता तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ सोडण्यासाठी उत्तम संधी आहे. याबाबत मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. संकेत शाह यांनी मार्गदर्शन केलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कोविड-19 सारख्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून त्याअंतर्गत अनेक नियमावली आखण्यात आली आहे. पानठेले, वाईन शॉप्स, बार बंद ठेवल्याने व्यसनींना तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध होत नाहीत आणि त्यांना अस्वस्थता आणि मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागत आहे. मात्र ही अस्वस्थता काही चांगल्या परिणामाकडेही घेऊन जाऊ शकते असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

हे वाचा - 'टेस्ट ट्युब बेबी'साठी तुमचं मानसिक आरोग्यही महत्त्वाचं; अशी घ्या स्वत:ची काळजी

स्मोक फ्री वर्ल्ड या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार,

एप्रिलच्या मध्यापर्यंत 18 ते 69 वयोगटातील 66 टक्के भारतीयांनी निरोगी जीवन जगण्यासाठी धूम्रपान सोडण्याची इच्छा व्यक्त केली. 63% भारतीयांनी धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न केला आणि 18 ते 24 वयोगटातील 72% तरुणांनी धूम्रपान सोडलं.

तंबाखूची उपलब्धता नसल्यामुळे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर कडक शिक्षा होण्याच्या भीतीने लॉकडाऊन कालावधीत तंबाखूचे सेवन कमी झाल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी शारीरिक तसेच श्वासोच्छवासाचे व्यायाम, योग आणि ध्यानधारणा यासारख्या अशा चांगल्या सवयींचा अवलंब केला. अशाप्रकारे लॉकडाऊनदरम्यान तंबाखूचे सेवन कमी झाले आहे आणि कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने लोकं निरोगी जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करत आहे.

धूम्रपानासारख्या वाईट सवयी सोडण्यासाठी खालील गोष्टींचे अनुसरण करा

सुरुवातीला तुम्हाला व्यसन सोडताना त्रास होऊ शकतो. तलफ आल्यास त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःचे मन इतर गोष्टींमध्ये रमवा.

वर्क फ्रॉम होम करत असताना तुम्हाला ज्या ज्या वेळी तलफ जाणवते त्याची नोंद करा.

अगदीच इच्छा झाल्यास साखरविरहित निकोटीन गमचे अथवा कॅंडीचे सेवन करा.

घरी असताना गाजरासारख्या पदार्थांचे सेवनही उत्तम ठरेल.

आवडते छंद जोपासा. त्यामध्ये स्वतःला गुंतवून घेण्याचा प्रयत्न करा.

धूम्रपान करणाऱ्या इतर व्यक्तींपासून दूर रहा.

हे वाचा - महाराष्ट्रातील शाळा कधी उघडणार? लॉकडाऊनच्या निर्णयानंतर हालचालींना वेग

निरोगी राहण्यासाठी व्यायाम करा. एरोबिक्स,योगा तसेच मेडिटेशनसारख्या पर्यायांचा वापर करा. हे आपल्याला तणाव आणि चिंता कमी करण्यास देखील मदत करतील. हे आपला राग, अस्वस्थता, थकवा, डोकेदुखी, निद्रानाश आणि निराशा कमी करण्यात नक्कीच मदत करतील.

समुपदेशनासारख्या पर्यायांचा अवलंब करा. ऑनलाईन धूम्रपान निवारण कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रयत्न करा, समुपदेशनाची निवड करा. स्वत: मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करा.

धूम्रपानाचे दुष्परिणाम जाणून घ्या. यशस्वीरित्या तंबाखू सारख्या व्यसनातून मुक्त झालेल्या व्यक्तीशी संवाद साधा जेणेकरून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळवता येईल.

हे वाचा - मोठी बातमी! देशात लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला, सरकारकडून नवी गाईडलाईन जाहीर

First published: May 31, 2020, 3:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading