Sexual Wellness : तुमच्या मनातल्या पण आतापर्यंत विचारू न शकलेल्या प्रश्नांची उत्तरं... सेक्शुअल वेलनेस एक्सपर्टकडून.
प्रश्न 2 : माझं लग्न 2012 साली झालं. माझी पत्नी सुशिक्षित आणि सुंदर आहे. मला दोन मुलं आहे. सुरुवातीला आमचा संसार खूप छान चालला होता. पण आता मला पत्नीमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही. मला तिच्याकडून प्रेम, आदर मिळत नाही. त्यामुळे मी बाहेर प्रेमाच्या शोधात आहे. उत्साह आणि रोमांच वाढवण्यासाठी काही वेबसिरीज पाहिल्या ज्यामध्ये डोळे बंद करून (Blind fold), threesome वगैरे प्रकार पाहिले. आता मी विवाहबाह्य संबंध ठेवण्यास उत्सुक आहे. त्यासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेतो आहे. पण मला दुसऱ्या बाजूला असं वाटतं की हे पाप आहे. काय खरं?
उत्तर : मला तुमची व्दिधा मनस्थिती समजतेय. परंतु, सुरक्षा आणि स्वातंत्र्याची आवश्यकता आणि स्थैर्य विरुद्ध अनिश्चिततेतून मिळणारा रोमांच - एक्साइटमेंट या दोन परस्परविरोधी गरजांमध्ये मनुष्य बांधला गेला आहे. या गरजांची निर्मिती भिन्न स्त्रोतांमधून होते आणि त्या आपल्याला त्यांच्याकडे खेचतात. त्यामुळे आपण चुकीच्या दिशेला खेचले जातो. आज बहुतांश जोडपी याच मुद्द्यामुळे अडचणींचा सामना करत असून ते रोमँटिक संबंधांमध्ये या तणावासोबत तोडगा काढू इच्छितात.
एकाच स्त्री बरोबर लग्न करून आयुष्य काढण्यामागे सुविधा, सवय, विश्वास, आपल्या मागे कोणीतरी आहे याची जाणीव, सुरक्षा, भावनात्मक गुंतवणूक, मुलांचं संगोपन, कायदेशीर मदत आणि आपली काळजी घेईल असं कुणी शेवटपर्यंत जवळ राहणं हा विचार होता. मात्र या बदलत्या काळात तंत्रज्ञानाच्या चौकटीने आपल्या अडचणी वाढवल्या आहेत.
आपण एका नोकरीनंतर दुसरी नोकरी, संबंध ठेवण्यासाठी दुसरी व्यक्ती, दुसरे घर आदींचा शोध घेत बसतो. आणि कालांतराने हीच गोष्ट आयुष्यातील गूढ वाढवते. पण सध्या अशी परिस्थिती आहे की आपल्यापैकी काहीजण आयुष्यभऱ लैंगिक आणि भावनिक गरजांसाठी पत्नीवर अवलंबून राहू इच्छित नाहीत. तसेच फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून हे एक प्रकारचे अतिक्रमण मानले जात आहे. मात्र हे खरे आहे आनंदाने किंवा काळजीपोटी झालेल्या विवाहांमध्येही लोक संबंध प्रस्थापित करतात. मात्र मला तुमच्या या स्थितीत कंटाळा हे संबंधाबाबत प्रश्न निर्माण करणारे प्रमुख कारण वाटते.
काही वर्षांनंतर बहुतांश जोडप्यांना लैंगिक जीवनात आलेला कंटाळा आणि रोमांचाची कमतरता या दोन मुद्द्यांना सामोरे जावे लागते. आपल्या पत्नीमध्ये आपल्याला रस राहिलेला नाही, हे याचे कारण होऊ शकत नाही. लैंगिक जीवनात वैविध्याची कमतरता हे यामागचे एक कारण असू शकते. तुम्ही सांगितले की वेबसिरीजमध्ये विविध लैंगिक क्रिया पाहिल्या असून त्यामुळे तुमची उत्तेजना वाढते. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या लैंगिक जीवनामध्ये विविधता आणि रोमांच अधिक प्रमाणात हवा आहे. वैवाहिक नात्याच्या परिघात राहून हे मिळवणे अशक्य नाही. असेही असू शकते की तुमच्या पत्नीलाही हेच हवे आहे. एक तुम्हाला तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक चांगला जोडीदार मिळत असल्याने एक नियमित जोडीदार असणे फायदेशीरच आहे. एक पक्का जोडीदार असल्यामुळे तुम्ही विविध गोष्टींचा प्रयत्न करू शकता.
तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत प्रामाणिक आणि खुलेपणाने संवाद साधण्याची गरज आहे. तुम्हाला काय जाणवतय हे तुम्ही तिला सांगा. पत्नीसमोर मोकळेपणाने आपले विचार मांडणे आवश्यक आहे. मात्र हा संवाद साधताना आपल्या पत्नीलाही त्यांचे विचार खुलेपणाने मांडण्याची संधी द्यावी. त्यांच्या मनातील भावना जाणून घ्या. लैंगिक आयुष्य अधिक सुदृढ व्हावे यासाठी दोघे मिळून काय करु शकतो याचाही शोध तुम्ही घेतला पाहिजे. अस्वाभाविक बीडीएसएम किंवा तत्सम लैंगिक क्रियांसाठी त्यांची खुली वृत्ती असू शकते. असेही होऊ शकते की त्या अभिनय, खेळणी, उत्तेजक अंतर्वस्त्र किंवा काही नव्या पोझिशनचा वापर केल्याने तुमच्या लैंगिक आयुष्यात बदल होतील. परंतु जोपर्यंत तुम्ही तुमच्या पत्नीशी संवाद साधत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही ठोस समजू शकत नाही. तुम्ही तुमच्या इच्छा आणि स्वप्न त्यांच्यासोबत शेअर करा तसेच या इच्छा व स्वप्नांमध्ये सहभागी होताना अपराधीपणा बाळगण्याची आवश्यकता नाही, असा विश्वास त्यांना द्यावा. याबाबतचा संवाददेखील प्रेमपूर्वक होऊ शकतो.
प्रश्न १ - BBW चं आकर्षण वाटतं, मोठ्या वयाच्या स्त्रियांकडे आकर्षित होणं नैसर्गिक आहे की...
हे लक्षात ठेवा की आपल्या पत्नीची लैंगिक आवड कमी होण्याची कारणे समजली जाऊ शकतात. मात्र त्यावेळी तुम्हाला पत्नीसोबत पूर्ण इमानदारीने वागावे लागेल. तुम्ही जे काही करणार आहात त्याची माहिती तुमच्या पत्नीला असायला हवी तसेच ती गोष्ट त्यांच्या मर्जीने देखील व्हायला हवी. अशी अनेक दांपत्ये आहेत की जे एकापेक्षा अधिक प्रेमसंबंध, खुले संबंध ठेवत आहेत. संबंध ठेवण्यासाठी यापैकी कोणते मॉडेल तुमच्यासाठी उपयोगी आहे की नाही याचा शोध घ्या. जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सांभाळण्यासाठी काहीच करायचे नसेल तर सरळ हे संबंध तोडून टाका, पण आपल्या पत्नीला कोणत्याही प्रकारचा धोका देऊ नका.