बड्डे आहे घोड्याचा! चेतकच्या मालकाची जंगी पार्टी; 22 किलोचा केक आणि भरपेट मेजवानी

बड्डे आहे घोड्याचा! चेतकच्या मालकाची जंगी पार्टी; 22 किलोचा केक आणि भरपेट मेजवानी

घोड्याचा वाढदिवसाला (Horse’s Birthday) मालकानं जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं.

  • Share this:

पाटणा, 05 मार्च : आपण आजपर्यंत एखाद्या लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केल्याचं पाहिलं आहे. या वाढदिवसाच्या पार्टींमध्ये तुम्हीसुद्धा सहभागी झाला असाल. पण एखाद्या घोड्याचा वाढदिवस (Horse’s Birthday) साजरा करण्यासाठी जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त भलामोठा केक कापला असं ऐकल्यानंतर तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे बिहारच्या (Bihar) सहरसाइथं एका व्यक्तीनं आपल्या लाडक्या घोड्याच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करत तब्बल 22 किलोचा केक कापला आहे.

सहरसाच्या पंचवटी चौक येथे राहणारा रजनीश कुमार (Rajneesh Kumar ) उर्फ गोलू यादवने सोमवारी संध्याकाळी आपला लाडका घोडा चेतकचा (Chetak) वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. चेतकच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये मोठ्या संख्येनं लोकं सहभागी झाले होते. चेतकच्या वाढदिवसानिमित्त जेवणाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे तब्बल 22 किलो वजनाचा केक कापला. चेतक घोड्याच्या वाढदिवसाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे.

गोलू यादव आपल्या मुलाप्रमाणं चेतकचे लाड करतो.  गोलू यादवनं सांगितलं की, ''चेतक सहा महिन्यांचा होता त्यावेळी मी त्याला घरी आणलं होतं त्यानंतर त्याला दूध पाजून मोठं केलं. मी चेतकचा माझ्या मुलाप्रमाणं सांभाळ करतो. माझ्या मुलांपेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम करतो. चेतक आमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे. आम्ही त्याला कधीच प्राण्याप्रमाणे वागणूक दिली नाही.'

हे वाचा - एवढ्याशा म्हशीनं भल्यामोठ्या हत्तीला शिंगावर धरलं आणि... काय घडलं पाहा VIDEO

गोलू यादवनं सोमवारी सकाळी चेतकला आंघोळ घातली आणि वाढदिवसानिमित्त त्याला सजवून तयार केलं. चेतकच्या वाढदिवसानिमित्त गोलू यादवनं खास केक तयार करुन घेतला होता. या केकवर चेतकच्या फोटोसोबतच त्याचं नावदेखील लिहिलं होतं. चेतकच्या समोर केक ठेवण्यात आला आणि गोलू यादवनं केक कापला. केक कापताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. चेतकच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या जंगी पार्टीमध्ये आसपास राहणारी मंडळी मोठ्या संख्येनं सहभागी झाली होती.

गोलू यादवनं सांगितलं की, 'मी आजपर्यंत माझा वाढदिवस कधीच साजरा केला नाही. पण दरवर्षी चेतकचा वाढदिवस साजरा करतो. चेतकच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती'

हे वाचा - VIDEO : ना गाडी, ना घोडा चक्क उंटावर बीडमधील नवरदेवाची वरात; काय आहे कारण?

गोलू यादवने लोकांना आवाहन केलं की, 'त्यांनी कधीही कोणत्याही प्राण्याला प्राणी म्हणून वागणूक देऊ नये तर त्याला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक द्यावी.'यावेळी गोलूनं नागरिकांना प्राण्यांवर प्रेम करण्याचा संदेश दिला. दरम्यान, गोलू यादव आणि त्याच्या चेतक घोड्याची शहरामध्ये जोरदार चर्चा होत आहे. नागरिकांचं असं म्हणणं आहे की, 'गोलू फक्त सहरसासाठी नाही तर संपूर्ण बिहारसाठी एक आदर्श आहे.'

First published: March 5, 2021, 11:25 PM IST

ताज्या बातम्या