बिअर तुमच्या शरीरासाठी ठरू शकते वरदान पण...

बिअर तुमच्या शरीरासाठी ठरू शकते वरदान पण...

बिअरमध्ये असणारे घटक आतड्यांमधील हानिकारक बॅक्टेरीया नष्ट करण्यास मदत करतात असं एका रिसर्चमधून समोर आलं आहे.

  • Share this:

अॅम्स्टरडॅम, 02 नोव्हेंबर: बिअर म्हटलं की लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. मात्र याच बिअरचे शरीराला अनेक फायदे असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात बिअर पोटासाठी अत्यंत लाभदायी असल्याचं म्हटलं आहे. काय आहे वैज्ञानिकांचा दावा आणि बिअरचे फायदे काय आहेत पाहा.

बिअर पोटाच्या आतड्यांमधील किटाणुंना नष्ट करण्याचं काम करते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर बिअर पित बसाल. बिअर घेण्याचेही काही नियम पाळायला हवेत तरच त्याचा शरीराला योग्य फायदा होऊ शकतो.

वाचा-100 दिवस झोप घेण्यासाठी कंपनी देते 1 लाख रुपये, इथं करा अर्ज

अॅम्स्टरडॅम युनिवर्सिटीतील प्राध्यापकांनी एक शोधपत्रकात बिअर प्यायल्यानं शरीराला फायदा होत असल्याचा दावा केला आहे. प्राध्यापक एरिक क्लासेन यांच्या म्हणण्यानुसार स्ट्राँग बिअरमध्ये असे प्रोबायोटिक माइक्रोब्स आहेत जे आपल्या शरीरासाठी फायद्याचे असतात.

स्ट्राँग एका बिअरला साधारण दोन वेळा फरमेंट केलं जातं. तर साधारण बिअर तयार करताना एकवेळाच फरमेंटची प्रोसेस केली जाते. प्रोबायोटिक पेय तयार करणाऱ्या कंपनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या सेमीनारमध्ये प्राध्यापक सांगत होते. फरमेंटेशन दोन वेळा करण्यासाठी बिअरमध्ये यीस्टचा वापर केला जातो पेय त्यामुळे स्ट्राँग होण्यास मदत होते. या प्रक्रियेमध्ये एक असं अॅसिड बिअरमध्ये तयार होतं जे शरीरातील आतड्यांमध्ये असणाऱ्या हानिकारक बॅक्टेरियांना नष्ट करतं.

वाचा-सावधान! लहान मुलांना पोलिओ टाइप-2 व्हायरसचा धोका

पोटात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. त्यापैकी काही बॅक्टेरिया हे आपल्या पोटाला हानिकारक असतात. तर काही बॅक्टेरिंयांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे पोटाचे विकार सुरू होतात. अशा बॅक्टेरियांना मारण्यासाठी स्ट्राँग बिअर एकदम फायदेशीर उपचार आहे.

बिअर घेताना त्यांनी आपलं तारतम्य सोडून घ्यावं असं कुठेही म्हटलं नाही. उलट बिअर औषध म्हणून घ्यावी असा दावा त्यांचा आहे. बिअरची अधिक मात्र शरीरासाठी आणि पर्यायाने मेंदूसाठी हानिकारक ठरू शकते. तुम्ही दिवसातून एक छोटी बिअर घेतली तर ती शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते असा दावा प्राध्यापकांनी केला आहे.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

First published: December 2, 2019, 2:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading