Fact check - भरपूर पाणी प्यायल्याने कोरोनाव्हायरसचा नाश होतो?

कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धोका टाळण्यासाठी काही मिनिटांच्या अंतरांनी पाणी प्यावं (Drining water) अशा टिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • Share this:

मुंबई, 30 मार्च : आपल्याला कोरोनाव्हायरस (Coronavirus) होऊ नये, यासाठी प्रत्येक जण काळजी घेत आहे. सोशल मीडियावर या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काही टीप्स व्हायरल होत आहेत. यामध्ये बहुतेक टिप्स या चुकीच्या आहेत. अशीच एक टिप्स म्हणजे म्हणजे काही मिनिटांच्या अंतराने पाणी प्यायल्याने (Drinking water) कोरोनाव्हायरसचा संसर्ग टाळता येऊ शकतो.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या काही पोस्टवर म्हणण्यात आलं आहे की, आपलं तोंड आणि घसा सतत ओला ठेवायला हवा, यासाठी दर 15 मिनिटांनी पाणी प्यायला हवं यामुळे आपली ग्रासनलीत व्हायरस पोटात जातील आणि पोटातील अॅसिडमुळे त्यांचा नाश होईल.

मात्र खरंच पाणी प्यायल्याने कोरोनाव्हायरसचा नाश होतो का? याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?

हे वाचा - 'भारताला 21 नाही तर 49 दिवसांचा लॉकडाऊन वाचवू शकतो', तज्ज्ञांचा इशारा

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनमध्ये एपिडेमोलॉजिस्ट कल्पना सबापैथी यांनी बीबीसी फ्युचरला सांगितलं की, संसर्ग हा एका व्हायरल कणामुळे नाही तर हजारो किंवा लाखो पार्टिकल्सच्या संपर्कात आल्यानं होतो. त्यामुळे ग्रासनलीतील मोजक्याच व्हायरसची स्वच्छता करून त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

आणि समजा असं करून तुम्ही सर्व व्हायरस पोटात नेऊन त्यांचा नाश केला अशी शक्यता असली तरीदेखील तोपर्यंत नाकामार्फत काही व्हायरस तुमच्या शरीरात गेलेले असतील. जरी नाकामार्फत व्हायरस श्वासनलिकेत नाही पोहोचले तरीदेखील शरीराच्या इतर भागातून ते शरीरात जाऊ शकता. डोळ्यांना हात लावूनही व्हायरस शरीरात जाऊ शकतात.

तसंच सौदी अरबमध्ये 2012 साली कोरोनाव्हायरससारखाच एक व्हायरस पसरला होता. या व्हायरसमध्ये पोटातील अॅसिडलाही प्रतिरोध करण्याची क्षमता होती. हा व्हायरस पोटातही जिवंत राहात होता, असं शास्त्रज्ञांना दिसून आलं.

हे वाचा - कोरोनाग्रस्त आईने Breasfeeding केल्याने बाळाला व्हायरसचा धोका असतो का?

तसंही कोरोनाव्हायरस हा थेट तोंडाच्या माध्यमातून पसरत नाही तर संसर्गजन्य व्यक्ती खोकल्यानंतर आणि शिंकल्यानंतर त्यातून निघणारे थेंब श्वासावाटे शरीरात जातात. अशापद्धतीने व्हायरस पसरतो. त्यामुळे पाणी प्यायल्याने व्हायरसचा नाश होईलच असं नाही.

जर कोरोनाव्हायरसचा धोका टाळायचा असेल, तर हात स्वच्छ धुवा, स्वच्छता राखा, आपल्यासमोर कुणी शिंकत, खोकत असेल तर त्याला रूमाल धरायला सांगा, तुम्ही तुमच्या तोंडावर रूमाल धरा. अशी छोटी छोटी काळजी घेतल्यानंही कोरोनाव्हायरससारख्या महाभयंकर विषाणूपासून तुम्ही स्वत:चा बचाव करू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2020 12:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading