केस काळे करण्यासाठी तुम्हा वापरताय हेअर डाय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

केस काळे करण्यासाठी तुम्हा वापरताय हेअर डाय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

तुम्ही पांढरे केस लपवण्यासाठी केसांना डाय करत असाल तर सावधान

  • Share this:

मुंबई: तुमचे केस पिकले आहेत का? तुम्ही पिकलेले केस लपवण्यासाठी डाय करता का? तुम्ही पांढरे केस लपवण्यासाठी केसांना डाय करत असाल तर सावधान. केसांना डाय केल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. अनेक महिला आपले पांढरे केस लपवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल्सचा वापर करून तुम्ही केस डाय करत असाल तर तुम्ही स्वत:हून ब्रेस्ट कँन्सरसारख्या धोकादायक आजाराला आमंत्रण देत आहात.  National Institutes of Health यांनी केलेल्या एक अभ्यासाद्वारे ही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. महिला केसांना डाय करण्यासाठी परमनंट हेअर डायचा वापर करतात अथवा केमिकल हेअर स्ट्रॅटनरचा वापर करतात. त्यामुळे महिलांना ब्रेस्ट कँन्सरचा धोका वाढू शकतो.

वाचा-Jio, Vodafone-Idea, Airtel चा ग्राहकांना दणका, जाणून घ्या रिचार्ज किती महागले

महिलांसाठी केस हे सौदर्यांचं सर्वात मोठं आणि विलक्षण सुंदर असं साधन आहे. आपले केस छान राहावेत म्हणून त्या कायमच त्यासाठी प्रयत्न करतात. केसांमुळे महिलांच्या सौंदर्यात आणखी वृद्धी होत असते. हल्ली महिलांचे केस लवकर पांढरे होत असल्यानं परमंट डायचा पर्याय अवलंबतात.

या हेअर डायमुळे महिला ब्रेस कँन्सरसारख्या गंभीर आजाराला आमंत्रण देतात हे मात्र त्यांना लक्षात येत नाही. परमनंट हेअर डाय करणाऱ्या महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. नेमकं काय कारण असू शकतं जाणून घेऊया.

वाचा-Jio च्या नव्या रिचार्जवर 300 टक्के जास्त फायदे, NEW ALL-IN-ONE PLANS ची घोषणा

या संशोधनात असं समोर आलं आहे की ज्या महिला केसांना हेअर डाय करतात त्यांना ब्रेस्ट कँन्सरचा धोका अधिक असतो असं समोर आलं आहे. 46 हजार 709 महिलांवरुन हे संशोधन करण्यात आलं ज्यामध्ये डाय करणाऱ्या महिलांमध्ये 9 टक्के महिलांमध्ये कँन्सरचं प्रमाण आढळलं आहे. तर केमिकल हेयर स्ट्रेटनर वापरणाऱ्या महिलांमध्ये 30 टक्क्यांहून अधिक महिलांचा समावेश आहे. ज्यांना कँन्सचा धोका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ब्रेस कँन्सरचा धोका आणि डेअर डाय़ करण्याचं प्रमाण अमेरिका आणि अफ्रीकेत सर्वाधिक असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. तिथल्या महिला 5 ते 8 आठवड्यातून एकदा हेअर डाय करतात. असं केल्यानं ब्रेस्ट कँन्सरचा धोका 60 टक्क्यांहून अधिक जास्त वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे हेअर डाय करण्याच्या नादात आपलं आयुष्य पणाला लावू नका. त्यासाठी योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

(टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)

First published: December 5, 2019, 1:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading