खोकल्याव्यतिरिक्त अनेक समस्यांवर गुणकारी आहे सुूंठ, थंडीत जरूर करा सेवन

खोकल्याव्यतिरिक्त अनेक समस्यांवर गुणकारी आहे सुूंठ, थंडीत जरूर करा सेवन

खोकला झाल्यास सुंठीचं सेवन केलं जातं, त्यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो हे आपणा सर्वांना माहितीच आहे. मात्र याशिवायही सुंठीचे अनेक फायदे आहेत. विशेषत: थंडीत सुंठीचा आहारात आवर्जून समावेश करावा.

  • Share this:

'सुंठीवाचून खोकला गेला' अशी म्हण आहे. म्हणजे सुंठ ही खोकल्यावर रामबाण औषध आहे. खोकला झाल्यास सुंठीचं सेवन केलं जातं, त्यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो हे आपणा सर्वांना माहितीच आहे. मात्र याशिवायही सुंठीचे अनेक फायदे आहेत. विशेषत: थंडीत सुंठीचा आहारात आवर्जून समावेश करावा. कारण थंडी म्हटलं की आरोग्याच्या अनेक समस्या आल्या. खोकला, ताप, सांधेदुखी या समस्या थंडीत अधिक बळावतात आणि या सर्वांवर सूंठ फार उपयुक्त आहे. सुंठीचे नेमके काय फायदे आहेत जाणून घेऊयात.

1) सुंठ आणि खडीसाखर एकत्र करून त्याचा पाक चाटल्याने खोकला कमी होतो.

2) सुंठ घातलेले पाणी उकळून प्यावं ताप कमी होतो.

3) छातीत कळ आल्यास फक्त सुंठीचं चाटण दिलं तरी बरं वाटतं.

4) सातत्याने ढेकर येत असेल तर त्यावर सुंठीचं चाटण खावं.

5) सुंठ खाल्ल्याने खूप भूक लागते.

6) अजीर्णाची समस्या असल्यास सुंठ ताकात उगाळून प्यावी.

7) घशात जळजळ आणि आंबट उलटी अशी आम्पपित्ताची लक्षणं असतील, तर सुंठ, आवळकाठी आणि खडीसाखर समप्रमाण घेऊन खावं.

8) आमवात म्हणजे सांध्याच्या ठिकाणी सूज आल्यास त्यावरही सुंठीचे सेवन फायदेशीर आहे.

9) अर्धांगवायू असलेल्यांना सुंठ पूड, लसूण आणि तूप एकत्र करून घ्यावं.

10) भोवळ, अर्धशिशी, डोकेदुखीची समस्या असल्यास सुंठ उगाळून त्याचा लेप लावावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2020 01:41 PM IST

ताज्या बातम्या