चवीला आंबट-गोड पेरू; पोटाच्या अनेक समस्या करतो दूर

चवीला आंबट-गोड पेरू; पोटाच्या अनेक समस्या करतो दूर

फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही पेरू (guava) उत्तम आहे.

  • Last Updated: Sep 18, 2020 10:11 PM IST
  • Share this:

पेरूचं नाव जरी घेतलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. क्वचितच असं कुणी असेल ज्याला पेरू आवडत नसावा. आंबट-गोड असा हा पेरू फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही उत्तम आहे. आयुर्वेदात पेरूला खूप महत्त्वं आहे. पेरूच्या बिया खाणं खूप फायदेशीर असतं, असं सांगितलं आहे. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह असतं. अशा पोषक घटकांनी युक्त पेरू खाल्ल्याने आरोग्याला खूप फायदा होतो.

पेरूचे नेमके आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत पाहुयात.

पोटदुखीपासून मुक्तता

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल म्हणाले, पोटदुखीची समस्या चुकीच्या आहारामुळे उद्भवते. आहारासंबंधी अनियमिततेमुळे पोटदुखी होणं सामान्य आहे. यावर उपाय म्हणून पिकलेल्या पेरूच्या फोड मीठ लावून खावी. यामुळे पोटदुखी बरी होते. पेरूच्या बिया पोट साफ करण्यास मदत करतात.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

बऱ्याच जणांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास सामान्य आहे. त्यांनी नाश्त्यामध्ये दररोज पेरू खाल्ला पाहिजे. बद्धकोष्ठतेची समस्या जास्त असल्यास सकाळी आणि संध्याकाळी पेरू खाणं आवश्यक आहे.

गॅस, अपचन दूर करण्यात उपयुक्त औषध

आम्लपित्त कमी करण्यासाठी पेरूच्या बिया अत्यंत प्रभावी आहेत. या बिया काढून त्यात गुलाबाचे पाणी आणि खडीसाखरेसह घेतल्यास आम्लपित्त कमी होतं. ज्यामुळे गॅस आणि अपचनाची समस्याही दूर होते.

पेरू हिमोग्लोबिन वाढवते

लोह आणि जीवनसत्त्व सी दोन्ही पेरूमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. लोह हिमोग्लोबिन वाढवण्याचे कार्य करतं आणि जीवनसत्त्व सी शरीरात लोह शोषण्याचं कार्य करतं. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे दोन्ही घटक आवश्यक आहेत. अशक्तपणा असलेल्या व्यक्तीनं पेरूचं सेवन केलंच पाहिजे.

मूळव्याधावर फायदेशीर पेरूची साल

मूळव्याध असल्यास पेरूची साल खूप फायदेशीर असते. 5-10 ग्रॅम पेरूच्या सालीचं चूर्ण घेऊन त्याचा काढा तयार करून प्यााव.  मूळव्याध असलेल्या रुग्णांनी कमीतकमी 1 महिन्यांपर्यंत हा काढा सतत प्यावा.

पेरूची पाने ताप कमी करतात

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, जर तीव्र ताप असेल तर पेरूची पाने बारीक करून त्याचा रस काढा आणि ताप असलेल्या व्यक्तीला द्या, याने ताप कमी होतो.

पेरू कुणी खाऊ नये

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी पेरू खाऊ नये. पेरू तसा थंड आहे मात्र त्यात तंतुमय घटक अधिक आहेत. ज्यामुळे गरोदर महिलेला अतिसार आणि बाळाला दूध देणाऱ्या महिलेला सर्दी होण्याची शक्यता असते.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - तोंड येणे: लक्षणे, कारणे, उपचार...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 18, 2020, 10:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading