त्याचा फक्त एकच हात देतोय कित्येकांना जीवदान; या दिव्यांगाला तुम्हीही कराल सलाम

ज्या एका हातावर तो स्वतः आयुष्य जगतो आहे, तोच हात त्याने कित्येकांचं आयुष्य वाचवण्यासाठी पुढे केला आहे.

ज्या एका हातावर तो स्वतः आयुष्य जगतो आहे, तोच हात त्याने कित्येकांचं आयुष्य वाचवण्यासाठी पुढे केला आहे.

  • Share this:
मुंबई, 18 जून : अगदी निरोगी, धडधाकट व्यक्तीही थोडे आजारी पडले किंवा त्यांना किरकोळ दुखापत झाली, तरी रडत बसतात. पण ज्यांना आयुष्यभर एखाद्या कमतरतेसह जगावं लागत असेल त्यांचं काय होत असेल. कुणाला हात नाही, कुणाला पाय नाही, कुणाला डोळे नाहीत अशा कितीतरी दिव्यांग व्यक्ती आहे, ज्या कोणतीही तक्रार न करता आपलं आयुष्य अगदी आनंदाने जगत आहेत. त्यापैकी काही दिव्यांग फक्त स्वतः जगत नाही आहेत, तर इतरांनाही जगवत आहे. स्वतः दिव्यांग असूनही इतरांना मदतीचा हात देत आहेत. अशाच दिव्यांपैकी एक म्हणजे मुंबईतील प्रवीण भांडेकर (Praveen Bhandekar). ज्यांचा फक्त एकच हात काम करतो, पण त्यांच्या या एकाच हाताने कितीतरी लोकांना जीवदान दिलं आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट ऑथोरिटीमध्ये (MMRDA) एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर (Executive Engineer) असलेले प्रवीण भांडेकर (Praveen Bhandekar). त्यांना बोलण्यात थोडी अडचण आहे. तसंच त्यांचा डावा हात लहानपणापासूनच निष्क्रिय असल्याने त्यांना उजव्या हातानेच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण या एकाच हाताने ते गेल्या 19 वर्षांपासून रक्तदान करत आहेत. 2002 पासून त्यांनी 25 वेळा त्यांनी रक्तदान केलं आहे. दिव्यांग (Differently Abled) असूनही ते रक्तदानात हयगय करत नाहीत. हे वाचा - मासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी? रक्तदान (Blood Donation) हे श्रेष्ठ दान मानलं जातं. कारण त्यामुळे गरजू व्यक्तीचा जीव वाचू शकतो. एवढंच नव्हे तर रक्तदान करणाऱ्या व्यक्तीच्या स्वतःच्या आरोग्यासाठीही रक्तदान चांगलं असतं. कोणीही निरोगी, प्रौढ व्यक्ती दर तीन ते चार महिन्यांनी रक्तदान करू शकते. रक्तदानाबद्दल पुरेशी जागरूकता असली, तरी नियमितपणे रक्तदान करणाऱ्या व्यक्तींची संख्या खूप मोठी नाही. काही मोजक्या व्यक्ती मात्र अगदी न चुकता नियमितपणे रक्तदान करतात. त्यापैकीच एक आहेत प्रवीण. प्रवीण यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ते कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून रक्तदान करतात. आपण दिव्यांग असल्यामुळे रक्तदान केल्यास काही अडचण निर्माण होईल, अशी भीती आपल्याला पहिल्यांदा वाटली होती, असंही त्यांनी सांगितलं. मात्र त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना धीर दिला आणि काहीही वावगं होणार नसल्याचं सांगितलं. तेव्हा त्यांनी उजव्या हाताने रक्तदान करायला सुरुवात केली आणि नंतर मागे पाहिलंच नाही. हे वाचा - जपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी प्रवीण यांनी कोरोना काळात आयोजित करण्यात आलेल्या अनेक रक्तदान शिबिरांमध्येही (Blood Donation Camps) सहभाग घेतला, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना फायदा होऊ शकेल. रक्तदानाचा अनुभव आपल्याला खूप समाधान देणारा असतो, असं ते सांगतात. आपल्या रक्तामुळे कोणाला तरी बरं वाटणार आहे, कोणाचा तरी जीव वाचणार आहे, ही भावनाच अतुलनीय असल्याचं ते म्हणतात. आपल्या रक्तगट ओ पॉझिटिव्ह असल्याने ते रक्त कोणत्याही रक्तगटाला चालतं. हेदेखील त्यांच्या समाधानाचं एक मोठं कारण आहे. आपल्या आईला आपल्या तब्येतीबद्दल काळजी वाटत असल्यामुळे तिने रक्तदान करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचंही प्रवीण यांनी सांगितलं. मात्र प्रवीण यांनी आपण न घाबरता रक्तदान करत आल्याचं सांगितलं. अलीकडेच सोशल मीडियावर प्रवीण यांचं नेटिझन्सनी खूप कौतुक केलं. हे वाचा - कोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का? 14 जून हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात जवळपास पाच लीटर रक्त असतं. रक्तदान करताना त्यातलं फक्त 450 मिलिलीटर रक्त काढून घेतलं जातं. तेवढं रक्त संबंधित व्यक्तीच्या शरीरात पुन्हा 24 ते 48 तासांत तयार होतं. त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. म्हणूनच रक्तदान करणारी व्यक्ती निरोगी आणि 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची असणं आवश्यक असतं. पुरुषांना दर तीन महिन्यांनी आणि स्त्रियांना दर चार महिन्यांनी रक्तदान करता येतं.
Published by:Priya Lad
First published: