काय म्हणावं आता? सर्वात मोठे ओठ हवेत म्हणून 20 वेळा सर्जरी; अन् ओठांची अक्षरश: वाट लावली

काय म्हणावं आता? सर्वात मोठे ओठ हवेत म्हणून 20 वेळा सर्जरी; अन् ओठांची अक्षरश: वाट लावली

22 वर्षांच्या तरुणीनं ओठांच्या सर्जरीनंतर (lip surgery) आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

  • Share this:

सोफिया, 13 मे :  आपण सर्वात सुंदर दिसावं असं प्रत्येक मुलीला वाटतं. सौंदर्यासाठी मुली जमेल ते सर्व काही करतात. सध्या नाजूक आणि गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ हे कुठेतरी मागे पडताना दिसत आहे आणि तरुणींना आता मोठ्या ओठांची भुरळ पडू लागली आहे. असंच जगातील सर्वात सुंदर आणि मोठे ओठ (Big lip) हवेत, यासाठी बुल्गारियातील (Bulgaria) एका तरुणीनं एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 20 वेळा सर्जरी केली. यानंतर तिने आपल्या ओठांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला थोडा धक्काच बसेल. कारण हे ओठ सुंदर आहेत, असं नक्कीच तुम्हाला वाटणार नाही. यातही आणखी धक्का तुम्हाला हे ऐकून बसेल की या ओठांसाठी या तरुणीनं 135 युरो म्हणजे जवळपास 11 हजार रुपये खर्च केलेत.

22 वर्षांची एंड्रिया इवानोवाने (Andrea Ivanova) 2018 साली ओठ मोठे करण्याची पहिली सर्जरी केली. त्यानंतर आतापर्यंत तिनं आपल्या ओठांवर 135 युरो खर्च केल्याचं सांगितलं आहे. गेल्या आठवड्यात तिनं आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो आता व्हायरल होतो आहे. हा फोटात तिच्या ओठांचा आकार खूप विचित्र दिसतो आहे.

 

View this post on Instagram

 

💖💖😎😎

A post shared by Andrea Ivanova (@andrea.andrea345) on

एंड्रियाचा ओठांचा हा आकार तुम्हाला आवडला नसेल, मात्र तिला हा आवडला आहे आणि आपले हे ओठ जगातील सर्वात मोठे असावेत असा दावा तिनं केला आहे. याचाच आनंद तिला जास्त आहे.

हे वाचा - अवघ्या एक वर्षाचा Baby Chef शिकवतोय रेसिपी, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल So sweet

अशी सर्जरी करून घेणारी एंड्रिया पहिलीच नाही. कित्येक जण सौंदर्यासाठी अशा वेगवेगळ्या सर्जरी करून घेतात. अशी कित्येक प्रकरणं आहेत. इराणची प्रसिद्ध इन्स्टाग्राम स्टार सहर तबर जिचं खरं नाव फातेमेह खिशवंद आहे, तिनंही हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जॉलीसारखं देण्यासाठी आपल्या चेहऱ्याची तब्बल 50 वेळा सर्जरी करून घेतली होती, त्यानंतर तिचा चेहरा पूर्णपणे बदलला होता.

संपादन - प्रिया लाड

हे वाचा - लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी आला 'वॉरिअर रोबोट', पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2020 05:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading