Explainer : कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या अचानक का वाढली? समोर आलं भयाण वास्तव

Explainer : कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या अचानक का वाढली? समोर आलं भयाण वास्तव

गेल्या महिन्यापासून कोरोनाचा (Coronavirus) आलेख पुन्हा वाढत आहे. हा ग्राफ आधीच्या तुलनेत जास्त भयंकर आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 एप्रिल : गेल्या वर्षभरापासून कोरोनाने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात सप्टेंबर 2020 मध्ये सर्वाधिक 97 हजार कोरोनारुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर रुग्णसंख्येत सातत्याने घट झाली. कोरोना जणू संपल्यातच जमा होता. पण गेल्या महिन्यापासून कोरोनाचा आलेख पुन्हा वाढत आहे. हा ग्राफ आधीच्या तुलनेत जास्त भयंकर आहे.

मंगळवारी देशात 96,563 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याच्या एक दिवसआधी रुग्णांचा आकडा एक लाखांच्या पार गेला होता. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा होता. या काळात संसर्गाची दररोजची प्रकरणं (सरासरी सात दिवस) आणि मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग वेगाने वाढला मात्र मृत्यूदर कमी होता. त्यामुळे लोक निवांत होते. मात्र गेल्या एका महिन्यात मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. 8 मार्चपासून कोरोनामुळे होणारे मृत्यू तुलनेने वाढले आहे. 8 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान दररोजच्या संसर्गाची सरासरी 50 टक्क्यांनी वाढली. मात्र मृतांची संख्या कमी होती. मात्र आता नवीन येत असलेली आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.

हे वाचा - News18 Lokmat Impact: रेमडिसिवीर इंजेक्शनच्या किमती कमी होणार

तर आता मुद्दा हा आहे, की या महिनाभरात असं काय घडलं की संसर्ग वेगाने वाढला. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत असल्याने केंद्र सरकारने (Central Government) 4एप्रिलला एक बैठक घेऊन यावर चर्चा केली. यामध्ये काही मुख्य कारणं समोर आली आहेत, जी कोरोनाचा ग्राफ वाढण्यास कारणीभूत असू शकतात.

कोरोनाला गांभीर्याने नं घेणं

पहिलं कारण म्हणजे कोरोनाला गांभीर्याने नं घेणं. म्हणजेच, वारंवार हात धुणं, सुरक्षित अंतर पाळणं आणि मास्क घालणं हे नियम पाळणं लोकांनी सोडून दिलं. बाजार, मॉल्स आणि हॉटेल्समधील गर्दी वाढायला लागली. ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तिथे प्रचारसभेसाठी मोठ्या संख्येने लोक येत आहेत. त्यापैकी मास्क लावणाऱ्यांची संख्या अगदीच कमी आहे. याआधी होळी आणि हरिद्वारच्या कुंभ मेळ्यातही लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. कोरोनाची चाचणी न करताच लोक फिरत होते.

पॅन्डेमिक फटिग

संसर्ग वाढण्याचं दुसरं कारण पॅन्डेमिक फटिग आहे. पॅन्डेमिक फटिग (Pandemic Fatigue) म्हणजे साथीचा थकवा. याचा अर्थ असा होतो, की लोक दीर्घकाळापर्यंत चालणाऱ्या अशा साथीच्या रोगाने इतके कंटाळले आहेत की ते त्यापासून बचावासाठीचे नियम पाळण्याऐवजी सामान्यरित्या जीवन जगू लागतात. यामध्ये चिडचिड वाढणं, झोप न येणं, कामात मन लागणं अशा अनेक बाबी येतात. यामुळेही संसर्ग वाढतो.

स्थानिक पातळीवर प्रशासनाचे दुर्लक्ष

कोरोनाचा ग्राफ वाढण्याचं एक कारण म्हणजे स्थानिक पातळीवर प्रशासनाचं (Local Administration) दुर्लक्ष. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आपण संसर्ग रोखण्यासाठी संशयित लोकांना विलगीकरणात ठेवत होतो. तेव्हा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (Contact Tracing) हा शब्द खूप चालला. त्यावेळी लोक देखील घाबरलेले असल्याने आरोग्याविषयी योग्य माहिती देत होते. मात्र ती भीती आता संपत आहे. त्यामुळे चाचण्या वाढवण्याची मागणी होत आहे.

कोरोनाचं बदलं रूप

अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा डबल म्युटेंट आढळला आहे. हा म्युटेंट झालेला विषाणू संसर्ग वेगाने पसरवतो. आपल्या देशातही अनेक यूकेसह विदेशी व्हेरिएंट (Foreign Variant) आढळले आहे.

R नंबरमध्ये वाढ

वरील कारणांव्यतिरिक्त, विषाणूच्या पुनरुत्पादनाचा दर (Reproduction rate), ज्याला R नंबर म्हणतात, त्यातही वाढ झाली आहे. तो ही संसर्गाच्या वाढीचं एक कारण आहे. याचा उल्लेख बीबीसीच्या (BBC News report) बातमीत करण्यात आला आहे. या बातमीत ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोरच्या एका तज्ज्ञाने असे म्हटले आहे, की पहिल्या लाटेमध्ये R क्रमांक 2 ते 3 दरम्यान होता. पण दुसर्‍या लाटेत हा क्रमांक 3 ते 4 च्या दरम्यान आहे. त्यामुळे या लाटेत संसर्ग वेगाने वाढला.

लसीकरणाची पद्धत बदलण्याची गरज

लसीकरणाचा वेग देखील संसर्ग वाढण्याचे एक कारण आहे. लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरण वेगाने (Speed of Vaccination) होण्याची गरज आहे. लस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

हे वाचा - ...म्हणून सर्वांना कोरोना लस देत नाही; उद्धव यांच्या मागणीनंतर केंद्राचं उत्तर

तज्ज्ञांच्या मते लाट आटोक्यात आणण्यासाठी ज्या राज्यात संसर्ग वेगाने वाढतोय त्यांच्यासाठी लसीकरणाची प्रक्रिया अनलॉक (Unlock) केली पाहिजे. मात्र, याची दुसरी बाजू अशीही आहे की लसीकरण प्रक्रिया अनलॉक केल्यास ज्यांना गरज आहे ते लोक मागे राहतील आणि बाकी लोक त्यांच्या आधी लस घेतील. यामुळेही संसर्ग वाढतच राहील.

First published: April 7, 2021, 7:23 AM IST

ताज्या बातम्या