Explainer: माणूसही सापासारखा poisonous होऊ शकतो का?

Explainer: माणूसही सापासारखा poisonous होऊ शकतो का?

माणसांमध्ये असलेली लाळग्रंथी ही सापांमध्ये असलेल्या विषग्रंथींसारखीच आहे.

  • Share this:

तैवान, 1 एप्रिल :  विषपुरुष, विषकन्या हे तुम्ही एखाद्या गोष्टीत, पौराणिक कथेत ऐकलं असेल किंवा फिल्ममध्ये पाहिलंही असेल. पण खरंच माणूस असा सापासारखा विषारी (Snake poison) होऊ शकतो का? असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल.  सापाच्या विषासंबंधी जगात संशोधन सुरू असतंच. पण आता माणूसही सापाप्रमाणे विषारी (Human poison) बनू शकतो का याबाबतही संशोधन सुरू आहे. अशाच एका संशोधनाचे निष्कर्ष संशोधकांनी मांडले आहे.

माणसातील लाळग्रंथींमध्ये बदल करून त्या सापांइतक्या विषारी करता येणं विज्ञानाला शक्य आहे, असं या संशोधनात दिसून आलं. अमेरिकेतील विज्ञानासंबंधी मासिक प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमीत (PNAS) हे संशोधन मांडण्यात आलं.

विष काय असतं आणि काय करतं?

पशूंना त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी त्याला मारण्यासाठी आणि स्वसंरक्षणासाठी निसर्गाने त्यांच्या शरीरात काही ग्रंथी दिलेल्या आहेत ज्यांतून बाहेर येणारा स्राव म्हणजे विष. हे विष म्हणजे प्रोटिनचं मिश्रण असतं. आतापर्यंत संशोधक सापाच्या विषाचा अभ्यास करताना त्याच्या जीन्सवर लक्ष द्यायचे पण नव्या पद्धतीत त्याच्या शरीरातील ग्रंथींचा अभ्यास शास्रज्ञांनी सुरू केल्याची माहिती या अभ्यासात सहभागी असलेले विशेषज्ञ अग्निश बरूआ यांनी सांगितलं.

हे वाचा - 30 वर्षांनी उघडलं महिलेचं तोंड; भारतीय डॉक्टरांनी केली कमाल

ओकिनावा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि ऑस्ट्रेलियन नॅशनल विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात तैवानमधील वायपर सापाच्या विष तयार करणाऱ्या ग्रंथींचा अभ्यास करण्यात आला. त्यात त्यांना असं लक्षात आलं की या ग्रंथींना विष तयार करायला आणि इतर कार्यांसाठी 3000 जीन्स मदत करतात.

लाळ आणि विषग्रंथी सारखंच काम करतात

शास्रज्ञांना लक्षात आलं की उंदीर, कुत्री, चिंपाझी माकडं आणि माणसं या सगळ्यांच्या शरीरात विष तयार करण्याला मदत करणारे जीन्स आहेत. विशेष स्तनधारी प्राण्यांचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की माणसांमध्ये असलेली लाळग्रंथी ही सापांमध्ये असलेल्या विषग्रंथींसारखीच आहे. कदाचित अनेक शतकांपूर्वी माणसालाही ती शक्ती असेल पण क्रमिक विकासानंतर त्या ग्रंथीनीच लाळ तयार करायला सुरुवात केली असेल असा अंदाज तज्ज्ञांनी बांधला. माणसाची शेपटी गळून पडली तसाच हा बदल असावा. द इंडिपेंडंटने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. माणसातली विष ग्रंथी लाळ ग्रंथींत परावर्तित झाली तर सापात ती तशीच राहिली. याचा पुरावा आता शास्रज्ञांच्या हाती लागला आहे.

विषकन्या आणि विषपुरुष

जगभरातील लोककथांमध्ये विषकन्यांचा उल्लेख सापडतो. काही मुलींना लहानपणापासून विष देऊन विषकन्या बनवलं जायचं. त्यांचा वापर राजाला मारण्यासाठी किंवा गुपितं काढून घेण्यासाठी केला जायचा असे उल्लेख सापडतात पण त्याचा कुठलाही पुरावा कोणत्याही साहित्यात सापडत नाही.  विषपुरूषही पौराणिक कथांमध्ये आहेत, पण बिल हास्ट हे सध्याच्या जगातील विषपुरूष आहेत. ते मियामीतील सापांवर संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळेचे डायरेक्टर होते. सापाचं विष काढताना त्यांना अनेक विषारी सापांनी दंश केला होता. हळूहळू सर्वप्रकारच्या सापांच्या विषांसाठी त्यांची प्रतिकारशक्ती तयार झाली. गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव नोंदवलेलं आहे.

माणूस विषारी कसा होऊ शकतो?

माणसाला विषारी करण्याच्या प्रक्रियेत त्याला हळू हळू विष प्यायला देऊन त्याची रोगप्रतिकारशक्ती तयार केली जाते. बायोलॉजिकली क्लिष्ट विषच यासाठी वापरत. एकदा विष पाजलं की लिव्हर अधिक एन्झाइम सोडतं आणि ते विष पचवायला तयार होतं. हळूहळू विष पचवायची शक्ती माणसात निर्माण होते या पद्धतीला मिथ्रिडटिझम म्हणतात. सफरचंद किंवा इतर अनेक फळांच्या बियांमध्ये सायनाइड असतं ज्या कधीकधी आपण खाऊन टाकतो त्या माध्यमातून थोडंथोडं सायनाइड विष आपल्या पोटात जात राहतं. ते थोडं असल्यामुळे लिव्हर ते पचवतं पण ते जास्त घेतलं तर विषबाधा होऊ शकते.

हे वाचा - टॉयलेटवर सीटवर बसताच खालून आला अजगर आणि...; पुढे काय घडलं पाहा Shocking Video

तसं म्हटलं तर आताच्या माणसात बदल होऊन त्याच्या लाळग्रंथी विषग्रंथी होऊ शकतील पण ती शक्यता कमी वाटते असं शास्रज्ञांचं मत आहे.

Published by: Aiman Desai
First published: April 1, 2021, 10:48 AM IST

ताज्या बातम्या