कोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण?

कोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण?

कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर किती दिवसांनी स्वतःला निरोगी समजायचं?

  • Share this:

नवी दिल्‍ली, 18 जून : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये अनेक समस्या (Corona recovered patient complication) दिसत आहे. यात सर्वात जास्त फंगसने हाहाकार माजवला आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांसह पोस्‍ट कोविड (Post Covid) आजारांमुळे (Diseases) रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, ब्लॅक आणि व्‍हाइट फंगससह (White Fungus) लाँग कोविडच्या (Long Covid) रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या आजारांबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न येत आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कोरोनातून बरे झाल्यानंतरही आपण निरोगी आहोत की नाही. शिवाय कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर किती दिवसांनी स्वतःला निरोगी समजायचं?

कोरोनाची जगाशी ओळख झाल्यानंतर याची लक्षणं व्यक्तीच्या शरीरात 14 दिवस राहतात असं सांगण्यात आलं. या 14 दिवसांदरम्यान चाचणी केल्यास व्यक्ती पॉझिटीव्ह येऊ शकतो. त्यानंतर शरीरात कोरोना राहत नाही. मात्र, दिवसेंदिवस याबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरंही बदलली आहेत. याशिवाय कोरोना विषाणूही म्युटंट होत असल्याने त्याचा प्रभावही बदलतो आहे. फंगस आणि लाँग कोविड हे त्याचेच परिणाम आहेत. तुमच्या मनातील काही प्रश्नाबद्दल तज्ज्ञ काय सांगताहेत ते जाणून घेऊयात.

हे वाचा - मुंबईला दिलासा! पॉझिटिव्ही रेट घसरला; काय असतो हा Rate, कशी काढतात Positivity?

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेसचे (AIIMS) माजी संचालक एमसी मिश्र म्हणाले, कोरोना झाल्यानंतर तुम्ही स्वस्थ आहात की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला काही वेळ जाऊ द्यावा लागेल. कोरोना विषाणू म्यूटंट होतो आहे त्यामुळे रुग्णाला सौम्य लक्षणं असेल तर ते 14 दिवसांत बरा होतो. लक्षणं गेल्यानंतर रुग्ण स्वतःला निरोगी समजू शकतो.

गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांना लागू शकतो वेळ

डॉ. मिश्र म्हणाले, कोरोनाचे म्युटंट किंवा गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांना पूर्णपणे ठिक होण्यासाठी कमीत कमी एक महिना लागू शकतो. एखाद्याची वास घेण्याची क्षमता गेली असेल तर ती परत येण्यास मोठा कालावधी लागू शकतो. तर ताप, सर्दी, खोकला, आवाजातील बदल ही लक्षणं लवकरच जातात. मात्र ऑक्‍सिजन पातळी कमी झाल्यास आयसीयूची गरज भासू शकते. रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती राहिला असेल तर त्याला ठिक होण्यास दीड महिना लागू शकतो.

पोस्‍ट कोविड

पोस्‍ट कोविडमध्ये मधुमेह, हृदयासंबंधित आजार, किडनी किंवा लिव्हर, फुफ्फुसांमध्ये त्रास होतो. या समस्या आयुष्यभर त्रास देऊ शकतात. तसंच हे आजार किती दिवसांत ठिक होतील हे सांगणं कठीण आहे. एखादी व्यक्ती कोरोनातून बरी झाल्यानंतर 6 आठवडे काहीच त्रास नसेल तर ती व्यक्ती फिट आहे. म्हणजेच कोरोनातून बरे झाल्यानंतर सहा आठवडे स्वतःची चांगली काळजी घेणं गरजेचं आहे.

फंगस झाल्यानंतर ठीक होण्यासाठी लागणारा वेळ

डॉ. मिश्र यांनी सांगितलं, म्‍युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस कोरोनातून बरे झाल्यानंतर सहा आठवड्यात होऊ शकतो. हा आजार झाल्यानंतर रुग्णालयात जाणं भाग आहे. फंगस जर सुरुवातीला कंट्रोलमध्ये आला आणि त्याला डोळे आणि मेंदुत जाण्यापासून रोखण्यात आलं तर रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. फंगस 15 दिवसांत रुग्णाच्या मेंदूपर्यंत पोहोचतो. ब्लॅक फंगसमधून ठिक झाल्यानंतर 6 ते 8 आठवडे खबरदारी घेणं गरजेचं आहे. ब्लॅक फंगसची सर्व इंजेक्शन रुग्णालयात दिली जातात. तसेच डिस्चार्ज मिळाल्यानंतर दोन महिने आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

हे वाचा - मासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी?

कोरोनामुळे मुलांना कमी नुकसान झालंय. मात्र, पोस्ट कोविड झाल्यास याचा त्रास आयुष्यभर राहू शकतो. मुलांमध्ये आता पोस्‍ट कोविड मल्‍टी इन्‍फ्लेमेट्री सिंड्रोमची अनेक प्रकरणं आढळली आहेत. त्यामुळे किमान सहा आठवडे त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

Published by: Priya Lad
First published: June 18, 2021, 10:07 PM IST

ताज्या बातम्या