हृतिक रोशन करणार होता 6 व्या बोटाचं ऑपरेशन, पण...

अंगठा कापण्याच्या निर्णयावर हृतिकनं वडील राकेश रोशन यांच्याशी चर्चा केली आणि ते हृतिकच्या अंगठ्याच्या ऑपरेशनसाठी तयार झाले.

  • Share this:

बॉलिवूडमध्ये आपल्या पहिल्याच सिनेमातून स्टार झालेला हृतिक त्याच्या सहाव्या बोटामुळे नेहमीच चर्चेत होता. हृतिकच्या हातांना 10 नव्हे तर 11 बोटं असल्याने तो एकेकाळी फार चर्चेत होता.

हृतिकला त्याच्या 11 बोटांमुळे फार त्रास सहन करावा लागला होता. एका हाताला सहा बोटं असल्यामुळे शाळेतल्या दिवसांमध्ये त्याला अतिशय वाईट वाटायचं. याबद्दल हृतिकने अनेकवेळा मुलाखतीमध्येही सांगितलं आहे.

शाळेत असताना हृतिकचे मित्र दोन अंगठ्यावरून त्याची टिंगल करायचे. त्यामुळे शाळेमध्ये त्याला आपण इतरांपेक्षा वेगळं असल्यासारखं वाटायचं. मित्रांच्या सततच्या चिडवण्यामुळे हृतिक त्या मित्रांपासून लांबच राहायचा.

बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्यावेळी हृतिकला ही गोष्ट फार त्रासदायक ठरणार होती. मोठ्या पडद्यावर त्याने दोन अंगठे असलेला हाथ अनेकवेळा लपवण्याचाही प्रयत्न केला होता. एकदा दोन अंगठे असलेल्या हृतिकच्या हातावरील एक अंगठा त्याने कापण्याचा निर्णयही घेतला होता.

अंगठा कापण्याच्या निर्णयावर त्याने वडील राकेश रोशन यांच्याशी चर्चा केली आणि ते हृतिकच्या अंगठ्याच्या ऑपरेशनसाठी तयार झाले. पण हृतिकची आई पिंकी रोशन यांना मात्र हे मान्य नव्हतं. लहानपणापासून जर या अंगठ्यामुळे हृतिकला कोणताही शारीरिक त्रास झाला नाही तर त्यानं हा अंगठा कापणं चुकीचं आहे, असं त्याच्या आईला वाटत होतं. म्हणून हृतिकने आईचं म्हणणं ऐकून ऑपरेशन करण्याचा निर्णय रद्द केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2019 05:09 PM IST

ताज्या बातम्या