VIDEO : ...आणि भर रस्त्यात मलायका अरोरा गजरेवालीवर भडकली

VIDEO : ...आणि भर रस्त्यात मलायका अरोरा गजरेवालीवर भडकली

मलायकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

  • Share this:

मुंबई, 2 डिसेंबर : अभिनेत्री मलायका अरोरा मागच्या काही काळापासून अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे बरीच चर्चेत आहे. अर्जुनच्या वाढदिवसाला मलायकानं त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत या नात्याची कबुली दिली. त्यानंतर कोणत्याही कार्यक्रमात किंवा मुलाखतीत हे दोघंही एकमेकांबद्दल उघडपणे बोलताना दिसतात. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणानं लाइम लाइटमध्ये राहणारी मलायका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. ज्यात अरबाज खानचं नाव ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलताना दिसले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ फोटो जर्नलिस्ट योगेन शाहानं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात मलायका तिच्या जिममधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी गजरे विकणारी एक महिला तिला गजरा घेण्याची विनंती करते. त्यावेळी मलायका त्या महिलेला नाही म्हणून पुढे निघून जाते. पण ती महिला पुन्हा तिच्या मागे जाते. मलायका तिच्या कारमध्ये बसल्यावर ती गजरेवाली पुन्हा तिला गजरा घ्यायला सांगते. पण यावेळी ती गजरेवाली म्हणते, हा गजरा अरबाजकडून असं समजा. हे ऐकल्यावर मात्र मलायकाच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसला. पण तिनं काहीही बोलणं टाळलं आणि लगेच कारमध्ये बसून निघून गेली.

Bigg Boss च्या घरात पॉर्नची मागणी, अभिनेत्रीची जीभ घसरली; पाहा VIDEO

मलायकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मलायकाला या गजरेवालीचं बोलणं आणि विशेषतः अरबाजचं नाव घेणं फारसं आवडलेलं दिसलं नाही. तिच्या चेहऱ्यावरील नाराजी या व्हिडीओमध्ये लपत नाही. काही दिवसांपूर्वी मुलगा अरहानच्या बर्थडे पार्टीमध्ये अरबाज आणि मलायका एकत्र दिसले असले तरीही घटस्फोटानंतर त्यांच्यात मैत्री नाही हे या व्हिडीओमध्ये मलायकाच्या चेहऱ्यावरील भाव बघता लक्षात येतं.

सलमान खान करणार स्वतःहून 29 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स?

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मलायकान तिच्या वेडिंग प्लान बद्दल सांगितलं होतं. तिला तिचं ड्रीम वेडिंग ख्रिश्चन पद्धतीनं करायचं असल्याचं तिनं सांगितलं. याशिवाय लाँग व्हाइट गाऊन आणि ब्राइडमेट्स हे सर्व मला खूप आवडतं त्यामुळे माझंही लग्न असंच व्हावं अशी इच्छा आहे असं मलायकानं सांगितलं होतं. मलायकानं 12 डिसेंबर 1998 मध्ये अरबाज खानशी लग्न केलं होतं. त्यानंतर जवळपास 20 वर्षांच्या संसारानंतर 2017 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत तर अरबाज खान मॉडेल जॉर्जिया अँड्रीयानी हिच्यासोबत रिलेशिपमध्ये आहे.

कधी काळी 5 स्टार हॉटेलमध्ये वेटरचं काम करणारा अभिनेता आज आहे बॉलिवूड सुपरस्टार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2019 03:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading