मुंबई, 20 जुलै- ‘तुझ्यात जीव रंगला’ (
Tuzat Jiv Rangla) फेम अंजली (
Anjali) म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरच्या (
Akshya Devdhar) नव्या पोस्टने सर्वांनाचं घायाळ केलं आहे. अक्षयाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक नवा रील शेयर केला आहे. यामध्ये तिचा पारंपरिक अंदाज दिसून येत आहे. अक्षयाच्या मराठमोळ्या अदा पाहून चाहते तिच्यावर जाम फिदा झाले आहेत.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठी मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर खुपचं लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील अंजली म्हणजेच पाठकबाईच्या रुपात ती घराघरात पोहोचली होती. या मालिकेने तिला एक नवी ओळख निर्माण करून दिली होती. या मालिकेमुळे ती कित्येकांचा क्रश बनली आहे. तसेच मालिकेतील राणा आणि अंजलीची रांगडी प्रेमकथा चाहत्यांना भुरळ पाडून गेली होती. ही मालिका नेहमीच टीआरपीच्या रेसमध्ये पुढे असायची. काही महिन्यांपूर्वीचं मालिकेने निरोप घेतला आहे. मात्रतरीसुद्धा या कालाकरांची क्रेझ कायम आहे.
(हे वाचा:
विठ्ठल विठ्ठल! विठोबा - रखुमाई घेऊन दिपाली सय्यद हरिनामात झाली दंग)
मालिकेतील अंजली म्हणजेच अक्षया सोशल मीडियावर खुपचं सक्रीय असते. अक्षया ही मूळची पुण्याची आहे. अक्षयाचा सोशल मीडियावरसुद्धा मोठा चाहतावर्ग आहे. ती सतत नवनवीन पोस्ट शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात असतो. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत असतं. अक्षयाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ एक इन्स्टाग्राम रील आहे. अक्षयाने ‘मला म्हणत्यात ओ पुण्याची मैना; या ठसकेबाज गाण्यावर रील केला आहे. यामध्ये अक्षयाएकदम पारंपरिक अंदाजात दिसून येत आहे. अक्षयाच्या अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. या व्हिडीओवर अक्षयाला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.