
'तिला बाहेर काढावचं लागेल' त्या अभिनेत्रीच्या अटकेनंतर हडबडली होती राज कुंद्राची टीम; Chats Viral
रागेश्वरीला पॅरालीसिस (Paralysis) सारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावं लागलं होतं. ज्यामुळे तिला बोलणही कठीण झालं होत. 28 वर्षांपूर्वी रागेश्वरीने चंकी पांडे च्या आंखे या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होतं. पण 2000 साली रागेश्वरीच्या शरीलाला लखवा मारला ज्याने ती गंभीररीत्या आजारी पडली होती. तिची अवस्था इतकी बिकट झाली की तिच्या शरीराचा डावा भाग अजिबात हालचाल करू शकत नव्हती.
रागेश्वरीने 2000 साली आपल्या वडिलांसोबत एक अल्बम लाँच केला होता. पण हा अल्बम प्रदर्शित झाल्याच्या 1 आठवड्यानंतर रागेश्वरी आजारी पडली होती. दरम्यान हा अल्बम शुट करतानाच तिला मलेरिया झाला होता. आणि त्यातच तिला पॅरालिसीसचा अटॅक आला. तिला काहीही करण तसेच बोलणं ही शक्य नव्हतं. त्यानंतर जवळपास वर्षभर तिने पूर्णपणे फिजिओ थेरपी , योग , इलेक्ट्रिकल स्टीम्युलेशन या गोष्टींकडे लक्ष दिलं. त्यामुळे तिने लवकरच या अजारातून स्वतःला बाहेर काढलं.
2014 साली रागेश्वरीने लंडनला स्थाईक असणाऱ्या ह्यूमन राइट्स लॉयर सुधांशु स्वरुप याच्याशी विवाह केला. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिच्या लग्नाला हजेरी लावली होती. 2015 साली तिने एका मुलीला जन्म दिला. 44 वर्षीय रागेश्वरी आता लंडनला स्थाईक झाली आहे. तर आपल्या मुलीसोबत आणि पतीसोबत ती वेळ घालवत आहे.