सैफ अली खानला राणी मुखर्जीने लग्नासंदर्भात दिला होता बहुमोल सल्ला; स्वतः सैफने केला खुलासा

सैफ अली खानला राणी मुखर्जीने लग्नासंदर्भात दिला होता बहुमोल सल्ला; स्वतः सैफने केला खुलासा

सैफ अली खान (saif ali khan) आणि करीना कपूर (kareena kapoor) यांनी एकमेकांना डेटिंग (dating) करायला सुरुवात केली, तेव्हा राणीने (Rani Mukherjee) सैफला बहुमोल सल्ला दिला होता.

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी: बॉलिवूडची 'बेबो' अर्थातच करीना कपूर खान सध्या प्रेग्नन्सीचा काळ एन्जॉय करीत आहे. खरंतर सैफ अली खान तिची बरीच काळजी घेताना दिसत आहे. प्रेग्नंट असतानाही बेबो सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या प्रेग्नन्सीचे फोटो समोर आले होते. आता सैफ अली खान आणि करीनाचे चाहते त्यांच्या छोट्या पाहुण्याची वाट पाहात आहेत. दरम्यान या स्टार जोडप्यासंबंधित एक जुना किस्सा मीडिया रिपोर्टमध्ये व्हायरल होत आहे.

हा किस्सा बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीशी संबंधित आहे. राणीने सैफला लग्नाच्या शुभेच्छा देताना एक खास सल्ला दिला होता. हा संबंधित सल्ला काय होता ? याचा खुलासा स्वत: सैफनं करिनासमोर केला आहे. काही दिवसांपूर्वी सैफ करीनाचा चॅट शो 'व्हॉट वुमन वान्ट्स' वर आला होता. यावेळी त्यांनी राणीने दिलेल्या सल्ल्याची आठवण करून दिली.

यावेळी सैफ म्हणाला की 'आपण दोघांनी जेव्हा एकमेकांना डेटिंग करायला सुरुवात केली होती. तेव्हा राणीनं मला आपल्या लग्नासंदर्भात एक बहुमोल सल्ला दिला होता. त्यावेळी ती म्हणाली होती की, तू एका वर्कींग अभिनेत्रीला डेट करतोय. त्यामुळे तू तिला एक मर्द पुरूष समजून डेट कर. राणीच्या या वाक्याचा अर्थ करीनाला समान दर्जा देण्यासंदर्भातला होता.

सैफ पुढे म्हणाला की, 'राणीने करीनाला समान दर्जा देण्याचा सल्ला दिला होता. ती एक महिला आहे, म्हणून लिंगभेदाच्या अधारावर तिला दुय्यम स्थान देवू नको. दोघंही समान वागा, जसं की एका घरात दोन हिरो राहत आहेत. यामुळे तुम्हाला वैवाहिक कोणतीही समस्या उद्भवणार नाही. मला वाटतं की ती एकदम ठीक बोलली होती'. राणीचा हा सल्ला ऐकून करीनाला खूप आनंद झाला. यावेळी ती म्हणाली की, राणीने दिलेल्या सल्ल्याचं जगातील सर्व पुरूषांनी पालन करायला हवं.

Published by: News18 Desk
First published: January 27, 2021, 7:40 AM IST

ताज्या बातम्या