• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ग्लॅमरसाठी लाखोंचा खर्च; प्रियांकाच्या या स्नेक प्रिंट ड्रेसची किंमत पाहून व्हाल थक्क

ग्लॅमरसाठी लाखोंचा खर्च; प्रियांकाच्या या स्नेक प्रिंट ड्रेसची किंमत पाहून व्हाल थक्क

बॉलिवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून लोकांना प्रभावित करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही ग्लोबल फॅशन आयकॉनही (Global Fashion Icon) आहे. नाविन्यपूर्ण स्टाईल्स आणि लुक्समुळे ती सातत्याने चर्चेत असते.

 • Share this:
  मुंबई 27 जुलै : वैविध्यपूर्ण भूमिकांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Actress Priyanka Chopra) सध्या तिच्या स्टायलिश लूकमुळे (Stylish Look) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यापूर्वी देखील हटके लूकमुळे ती अनेकदा चर्चेत होती. काही वेळा तर विचित्र पध्दतीच्या लूकमुळे तिला सोशल मिडीयावर ट्रोलही करण्यात आले होते. मात्र तिचा नव्या स्टायलिश लूकमधील फोटो फॅन्सला खूपच आवडला आहे. बॉलिवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून लोकांना प्रभावित करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही ग्लोबल फॅशन आयकॉनही (Global Fashion Icon) आहे. नाविन्यपूर्ण स्टाईल्स आणि लुक्समुळे ती सातत्याने चर्चेत असते. नुकतीच प्रियांका लंडन येथे झालेल्या विंम्बल्डन टेनिस स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्यासाठी गेली होती. यावेळी प्रियांकाने स्नेक प्रिंटचा शर्ट (Sneak Print Shirt) आणि ट्राऊझर (Trousers) परिधान केला होता. सोज्वळ सासूबाईंचा बोल्ड लुक; PHOTOS पाहून तुम्हीही व्हाल थक्क मॅच पाहण्यासाठी जेव्हा प्रियांका पोहोचली तेव्हा प्रेक्षक तिच्याकडे पाहतच राहिले. मोकळे सोडलेले केस, युनिक स्टाईलचा स्नेक प्रिंट ड्रेस परिधान केलेली प्रियांका खूपच सुंदर दिसत होती. यावेळी प्रियांकाने लाईट मेकअपही केलेला होता. त्यासोबत गळ्यात नाजूकशी सोन्याची चेन आणि हातात ब्राऊन कलरची पर्स घेऊन प्रियांकाने आपली स्टाईल अधिक आकर्षक आणि परिपूर्ण केली होती. मात्र प्रियांकाने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल हे नक्की. प्रियांका चोप्राने परिधान केलेला शर्ट आणि ट्राऊझर आपण छायाचित्रात पाहत आहोत, तो इंटरनॅशनल लग्झरी ब्रॅण्ड आणि अमेरिकी फॅशन डिझायनर राल्फ लॉरेन यांच्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळेल. या ट्राऊझरची किंमत 1 लाख 47 हजार 905 रुपये आहे. तसेच स्नेक प्रिंट शर्टची किंमत सुमारे 1 लाख 21 हजार 982 रुपये आहे. याचाच अर्थ प्रियांका चोप्राने परिधान केलेल्या संपूर्ण सूटची किंमत 2 लाख 69 हजार 897 रुपये आहे. ..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू निक जोनस याच्याशी विवाहबध्द झाल्यावर प्रियांका चोप्रा लॉस एंजलिसमध्ये शिफ्ट झाली आहे. प्रियांका चोप्राने नुकत्याच मुंबईतील आपल्या दोन अपार्टमेंट 7 कोटींना विकल्या आहेत. यासाठी तिची आई मधु चोप्रा यांनी तिला मदत केल्याचे मीडियातील वृत्तात म्हटलं आहे. प्रियांका चोप्रा सध्या अनेक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टसमध्ये (International Projects) व्यस्त आहे. ती लवकरच सिटाडेल (Citadel) नावाच्या वेब शोमध्ये (Web Show) दिसणार आहे. या व्यतरिक्त ती अमेरिकी अभिनेत्री मिंडी कालिंग हिच्यासोबत एका वेडींग कॉमेडीमध्ये झळकणार आहे. सध्या ती लंडनमध्ये हॉलिवूड प्रोजक्टच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ती आपल्या रेस्टॉरंट व्यवसायावरही लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे.
  First published: