• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • लव्ह इज इन दि एअर! Valentine's day ला अभिनेत्रीनं शेअर केला Liplock Kiss चा फोटो

लव्ह इज इन दि एअर! Valentine's day ला अभिनेत्रीनं शेअर केला Liplock Kiss चा फोटो

व्हॅलेंटाइन डेनिमित्त सर्वचजण प्रेमाच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. याला बॉलिवूडचे कलाकारही अपवाद नाही आहेत.

 • Share this:
  मुंबई. 14 फेब्रुवारी : व्हॅलेंटाइन डेनिमित्त सर्वचजण प्रेमाच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. याला बॉलिवूडचे कलाकारही अपवाद नाही आहेत. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री सोनम कपूर-अहुजा. सोनम आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असते. सोनम सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. सोनम आणि तिचा नवरा आनंद आहुजा हे आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर त्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हॅलेंटाइन डे निमित्त सोनमने तिचा आणि नवरा आनंद आहुजाचा एक जुना रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 2016 साली सिटी ऑफ लव्ह म्हणजेच पॅरिसमध्ये हा फोटो त्यांनी काढला होता. सोनमनं व्हॅलेंटाइननिमित्त जुन्या आठवणींन उजाळा देण्यासाठी हा फोटो इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. 2016 ला सोनम आणि आनंद आहुजा रिलेशनशीपमध्ये होते. त्यावेळी त्यांनी हा फोटो काढला होता. सोनमच्या या फोटोला चाहत्यांकडून खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. सोनम आणि आनंदची केमिस्ट्री चाहत्यांना नेहमीच आवडत असते. त्यामुळे त्यांच्या फोटोला नेहमीच अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळत असतात. प्रेमात आकंठ बुडालेली ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री झाली होती कुमारी माता!
  8 मे 2018 ला सोनम आणि आनंद आहुजा लग्नबंधनात बांधले गेले. त्यानंतर सोनम अभिनय क्षेत्रापासून थोडी लांब जरी असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांना अपडेट्स देत असते. हा फोटो जरी जुना असला तरी चाहत्यांसाठी सोनम आणि आनंदचा रोमँटिक अंदाज नेहमीच आवडणारा आहे. सिद्धार्थ शुक्लानं घेतला अर्जुन कपूरशी पंगा, सोशल मीडियावर भांडणाचा VIDEO VIRAL
  Published by:Manoj Khandekar
  First published: