'अग्गंबाई सुनबाई'...शुभ्राने सुझैनची घेतली फिरकी; हा VIDEO एकदा पाहाच

झी मराठीवरील ‘अगंबाई सुनबाई’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

झी मराठीवरील ‘अगंबाई सुनबाई’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

  • Share this:
    मुंबई, 19 जून-  ‘अगंबाई सुनबाई’ (Agabai Sunbai) मालिकेमध्ये शुभ्रा (Shubhra)  आणि सुझैनचं (Suzain) चांगलंचं युद्ध बघायला मिळत असतं. एकीकडे शुभ्रा ही सोहम आपल्या आयुष्यातून जाऊ नये यासाठी धडपड करत आहे. तर दुसरीकडे सुझैन सोहमला शुभ्राकडून हिरावून घेण्याचा कट रचत आहे. या दोघींचं हे युद्ध प्रेक्षकांना चांगलचं पसंत पडत आहे. हे झालं ऑनस्क्रीनवरचं, मात्र ऑफस्क्रीन या दोघीही खुपचं धम्माल करत असतात. सध्या या दोघींचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आणि तो चाहत्यांना आवडला देखील आहे.
    नुकताच अभिनेत्री उमा ह्रीशिकेशने म्हणजेच नव्या शुभ्राने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये ती मालिकेतील सुझैनसोबत दिसून येत आहे. या दोघींनी एक मजेशीर संवादावर हा व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ मालिकेच्या चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे. या व्हिडीओवर बरेच लाईक्स आणि कमेंट्ससुद्धा येत आहेत. (हे वाचा:गौरीवर जयदीपच्या प्रेमाचा रंग चढला ; मालिकेत दिसणार नवी केमिस्ट्री  ) झी मराठीवरील ‘अगंबाई सुनबाई’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेत शुभ्रा आणि सोहमच्या सुखी संसारात सुझैन नावाच्या वादळाची एन्ट्री झाली आहे. शुभ्रा आपल्या सासऱ्यांच्या सोबतीने सोहमला आपल्या आयुष्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर दुसरीचकडे सुझैन दररोज एक नवं संकट शुभ्रासमोर उभं करत आहे. यासर्वांमध्ये शुभ्रा आपली स्वतःची ओळख बनवण्यासाठी धडपड करत आहे. तिच्या सासूबाई यासाठी तिला सहकार्य करत आहेत. (हे वाचा:'अशी ही बनवा बनवी' गाण्यावर अज्याचा धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL  ) मालिकेमध्ये शुभ्राची भूमिका साकारली आहे अभिनेत्री उमा ह्रीशिकेशने तर सोहम म्हणून अद्वैत दादरकर दिसून येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सासूची तर गिरीश ओक यांनी सासऱ्याची भूमिका साकारली आहे. ही मालिका ‘अगबाई सासूबाई’ मालिकेचा सिक्वल आहे. पहिल्या भागामध्ये तेजश्री प्रधानने शुभ्राची भूमिका साकारली होती.
    Published by:Aiman Desai
    First published: