• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू

..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू

या स्टार फॅमिलीबद्दल चाहत्यांना प्रचंड कुतूहल असल्यानं सतत त्यांच्याबद्दलच्या बातम्या, फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात.

 • Share this:
  मुंबई 27 जुलै: बॉलिवूड (Bollywood) स्टार्स सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) अर्थात सैफीना ही लोकप्रिय जोडी आहे. एवढंच नव्हे तर त्यांचा मोठा मुलगा तैमुर अली खान (Taimoor Ali Khan) जो चार -पाच वर्षांचा आहे, तो जन्मापासूनच मीडीयाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. सतत त्याचे फोटो, व्हिडिओ माध्यमांमध्ये झळकत असतात. सैफ आणि करीनाला यंदा दुसरा मुलगा झाला असून, त्याला मात्र त्यांनी जन्मापासूनच मीडीयापासून दूर ठेवलं आहे. जन्मानंतर बराच काळ त्याचा फोटोदेखील मीडियाला घेता आला नव्हता. नुकतच त्याचं नामकरण जेह असं करण्यात आलं असून, त्यानंतर त्याचे फोटो मीडियाला घेता आले आहेत. या स्टार फॅमिलीबद्दल चाहत्यांना प्रचंड कुतूहल असल्यानं सतत त्यांच्याबद्दलच्या बातम्या, फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. बराच काळ डेटिंग केल्यानंतर सैफ अली खान आणि करीना कपूर खाननं 2012मध्ये लग्न केलं. Video: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्या हातचं खेळणं अलीकडेच लॉकडाउनच्या (Lockdown) काळातील सैफ आणि करीनाचा एक किस्सा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कोरोना साथीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये बॉलिवूडमध्येही शूटिंग ठप्प होतं. या दरम्यान बॉलिवूड स्टारही अनेक महिने घरातच अडकून पडले होते. याच लॉकडाउनच्या काळात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खाननं मुलांबरोबर, कुटुंबीयांबरोबर भरपूर वेळ घालवला. या काळात त्यानं आपला मुलगा तैमूर अली खान याचे केसही कापले (Hair Cut). त्याच्या या उपक्रमाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. अलीकडेच सैफ अली खान ‘फीट अप विथ द स्टार्स सीझन 3’ (Feet Up with The Stars Season 3) मध्ये सहभागी झाला असताना, त्याला करीना कपूरचे केसही कापले का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सैफने अतिशय मजेदार उत्तर दिलं. ‘पॉर्न करण्यासाठी भाग पाडलं’; अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार ‘तिने माझ्यावर चाकूनं वार केले असते’: ‘फीट अप विथ द स्टार्स सीझन 3’ या कार्यक्रमात करीनाचे केस का नाही कापले या प्रश्नाचे उत्तर देताना सैफ अली खान म्हणाला की, तिचे केस मी कापले असते तर तिनं नक्की माझ्यावर चाकूनं वार केले असते.’ माझं कौशल्य तिच्या केसांवर वापरून पाहणं हे खूप धाडसाचं झालं असतं. तिचे केस म्हणजे राष्ट्रीय वारसा आहे. आम्ही अजूनही काम करत आहोत. त्यामुळे एकमेकांच्या केसांबाबत धोका पत्करू शकत नाही. ती माझ्या केसांशी खेळ करू शकते; परंतु सुदैवानं अद्याप तिनं असं केलेलं नाही,’ असंही सैफनं सांगितलं.
  First published: