ड्रग्जसंबंधी चौकशीनंतर दीपिका पादुकोण पहिल्यांदाच झाली व्यक्त; सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

ड्रग्जसंबंधी चौकशीनंतर दीपिका पादुकोण पहिल्यांदाच झाली व्यक्त; सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

ड्रग्ज कनेक्शन (drug connection) समोर आल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण (deepika padukone) सोशल मीडियापासून (social media) दूर राहिली होती.

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट : अभिनेत्री दीपिका पादुकोण (deepika padukone) सोशल मीडियावर (social media) अॅक्टिव्ह असायची. मात्र ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर ती सोशल मीडियापासून दूरच राहिली. ड्रग्ज प्रकरणात चौकशी झाल्यानंतर दीपिका पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे, तिची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होते आहे.

दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अभिनेता प्रभासचा उल्लेख केला आहे. या पोस्टमध्ये प्रभासचा फोटो शेअर करत तिनं त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिकाने म्हटलं, प्रिया प्रभास, तू नेहमी आनंदी आणि निरोगी राहा. येणारं वर्ष तुझ्यासाठी खूप चांगलं असेल, अशी आशा आहे.

दीपिका आणि प्रभास फिल्ममध्ये एकत्र काम करणार आहेत. या फिल्मच नाव अद्याप समजलेलं नाही. मात्र दीपिकानेच याआधी आपण आपण दाक्षिणात्या सुपरस्टारसोबत काम करणार असल्याचं सांगितलं होतं.

हे वाचा - "महेश भट्टच इंडस्ट्रीतील डॉन; ड्रग्जबाबतही माहिती", अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप

2017 साली दीपिकाने ड्रग्जच्या मागणीसंदर्भात केलेलं चॅट उघडकीस आलं होतं. या चॅटमध्ये तिने आपली मॅनेजर करिश्माकडे ‘माल’ आहे का अशी विचारणा केली होती. या चॅटमुळे  NCB ने दीपिकाला चौकशीसाठी बोलावलं. तेव्हा ती गोव्यात शकुन बत्रा यांच्या फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. ड्रग्ज प्रकरणात नाव येताच दीपिकाला शूटिंग अर्धवट सोडून मुंबईला यावं लागलं होतं. दीपिकाची अनेक तास चौकशी करण्यात आली होती. मी सुद्धा या चॅटचा एक भाग आहे हे दीपिकाने कबूल केलं होतं. या चौकशीनंतर दीपिकाचा फोनही जप्त करण्यात आला होता.

हे वाचा - 'लक्ष्मी बाँब'विरोधात निदर्शनं करणार हिंदू सेना,लव्ह जिहाद प्रसारित केल्याच आरोप

चौकशीनंतर दीपिका पुन्हा गोव्याला गेली. शकुन बत्रा यांच्या फिल्ममध्ये दीपिकासोबतच सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांचीसुद्धा महत्वपूर्ण भूमिका आहे.

Published by: Priya Lad
First published: October 23, 2020, 8:50 PM IST

ताज्या बातम्या