मुंबई, 03 डिसेंबर: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीस सिंह यांनी चित्रपटा इतकीच रिअल लाइफमध्ये चाहत्यांना भुरळ घातली आहे. दीपवीरला चित्रपटापासून ते रिअल लाइफमध्ये एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सोशल मीडियावरही त्यांची तुफान चर्चा आहे. दीपवीर जोडीची सिनेमा इतकीच प्रत्यक्षात चर्चा होताना पाहायला मिळते. अनेक चित्रपटांमधून या दोघांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. दीपिका पदुकोण-रणवीरच्या लग्नाला नुकतच एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यांनी वेडिंग अॅनिवरसरी साजरी केली. त्यांनी शेअर केलेल्या फोटोला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. रणवीर सोबत चित्रपट न करण्याचा निर्णय दीपिकाने घेतल्यानं चाहत्यांना आता ही गोड जोडी सिनेमात एकत्र काम करताना दिसणार नाही. त्यामुळे चाहत्यांचा थोडासा हिरमोड झाला आहे.
मुंबई मिररने दिलेल्या एका वृत्तानुसार दीपिका पदुकोण आता पती रणवीर सिंह सोबत पुढच्या काळात सिनेमा करण्यासाठी नकार दिला आहे. एकामागोमाग येणाऱ्या 3 सिनेमांसाठी रणवीस सोबत काम करणार नसल्याचं तिने सांगितलं आहे. दीपिकाच्या नकारामुळे चाहत्यांना थोडा धक्का बसला कारण पुन्हा दीपवीर ही जोडी सिनेमात नसल्यानं चाहते थोडे नाराज झाल्याची चर्चा आहे. आपण रणवीर सोबत सलग तीन सिनेमे करण्यास का तयार नाही याचं कारण तिने सांगितलं.
Loading...View this post on Instagram
ਸਤਿਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ 🙏🏽 Overcome with sheer gratitude ✨ @deepikapadukone
रिअल लाइफमधली माझी आणि रणवीरमधील केमेस्ट्री मला सिनेमातून एक्सपोज करायची नाही. त्यामुळे आम्ही एकत्र सलग तीन सिनेमांमध्ये काम करण्यास नकार दिला आहे.
दीपिका आणि रणवीर सिंह यांनी एकत्र बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या जोडीमुळे आणि कामामुळे चाहत्यांनी अक्षरश: सिनेमा डोक्यावर घेतला. 'गोलियों की रासलीला राम-लीला', बाजीराव 'मस्तानी' आणि 'पद्मावत' चित्रपटात दोघांमधील केमेस्ट्रीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांची भूमिका आणि रोमान्स प्रेक्षकांना चित्रपटातून जास्त आवडतो. त्यामुळे त्यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकही आतूर असतात.
दीपिका पदुकोण-रणवीर सिंह लवकरच एका सिनेमात दिसणार आहेत. दिग्गज क्रिकेटर कपिल देव यांच्या जीवनावर आधारी असणाऱ्या 83 चित्रपटासाठी दोघंही स्क्रीन शेअर करणार आहेत. रणवीर सिंह कपिल देव यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर दीपिका पदुकोण त्यांची पत्नी म्हणून भूमिका निभावणार आहे.
83 हा चित्रपटा दीपवीर जोडीचा एकत्र असा शेवटचा चित्रपट तर नाही ना? अशीही एक चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानंतर चाहत्यांमधील धाकधूक थोडी वाढली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा