भाचीसोबत गोंडस डान्स करतोय सलमान खान; बहिण अर्पिताने शेअर केला VIDEO

भाचीसोबत गोंडस डान्स करतोय सलमान खान; बहिण अर्पिताने शेअर केला  VIDEO

अर्पिता खान शर्माने (Arpita khan sharma) सलमान (salman khan) आणि तिच्या मुलीचा असाच एक गोंडस व्हिडीओ (Cute video) इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये सलमान आपल्या भाचीसोबत डान्स करताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी: बॉलीवूड अभिनेता (Bollywood actor) सलमान खान (salman khan) आपल्या कुटुंबावर किती प्रेम करतो, हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु आपल्या भाचा-भाचीवर (niece) त्याचं जरा जास्तचं प्रेम आहे. अर्पिता खान शर्माने (Arpita khan sharma) सलमान आणि तिच्या मुलीचा असाच एक गोंडस व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केला आहे. ज्यामध्ये सलमान आपल्या भाचीसोबत डान्स (Cute dance video) करताना दिसत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे फिल्म इंडस्ट्रीचं कामही पुढे ढकललं गेलं होतं.  पण आता सलमाननेही आपल्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करायला सुरवात केली आहे. या व्हिडिओमध्ये सलमान त्याच्या चित्रपटातील एका लुकमध्ये दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना अर्पितानं लिहिलं की, अमर्याद प्रेम! या व्हिडिओमध्ये सलमान भाची आयतला कुशीत घेऊन डान्स करत आहे आणि या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला बजरंगी भाईजान या चित्रपटातलं 'तू जो मिला' हे गाणं वाजत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, सलमान डोंगराळ भागात असून हे दृश्य मनमोहक आहे. तर सलमानने एक पगडी घातली आहे, यावरून लक्षात येतं की तो त्याच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे.

सलमान खान सध्या 'अंतिम' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून या चित्रपटात सलमानचा मेहुणा आयुष शर्मा देखील दिसणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान शीख पोलिसाची भूमिकेत दिसणार आहे. तर आयुष एका गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय प्रभुदेवा दिग्दर्शित 'राधे' हा चित्रपट 2021 मध्ये ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. या चित्रपटात दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूड्डा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Published by: News18 Desk
First published: January 23, 2021, 1:38 PM IST

ताज्या बातम्या