मुंबई, 15 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने (Juhi Chawla) नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती विमानतळावर दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिने एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या(Airport Authority of India) कारभारावर संताप व्यक्त केला आहे. त्याचं झालं असं की, आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर बुधवारी जुही चावला यूएईवरुन (UAE) भारतात येण्यासाठी निघाली. त्यानंतर हेल्थ क्लिअरन्ससाठी तिला बराच वेळ थांबावं लागलं होतं. जुही चावलाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या आजूबाजूला इतर प्रवासीही तात्कळत राहिलेले दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये काय आहे?
जुही चावलाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विमानतळावर हेल्थ क्लिअरन्ससाठी तिच्यासोबत अनेक प्रवासी रांगेत उभे आहेत. अनेक तास त्यांना तिथेच उभं राहावं लागत आहे. काही प्रवासी काऊंटरवरील लोकांना दूषणं देत आहेत. जुहीने शेअर केलेल्या व्हिडीओसोबत कॅप्शन दिलं आहे, विमानतळावरील वरिष्ठांनी आणि सरकारने या गोष्टीमध्ये लवकरात लवकर लक्ष घालावं. इथे हेल्थ क्लिअरन्साठी स्टाफ कमी असल्यामुळे प्रवाशांना अनेक तास असंच उभं राहावं लागत आहे. हे अतिशय लाजिरवाणं आहे.
Request the Airport and Govt authorities to IMMEDIATELY deploy more officials and counters at the Airport Health clearance ... all passengers stranded for hours after disembarking .. ... flight after flight after flight .....Pathetic , shameful state ..!!@AAI_Official pic.twitter.com/rieT0l3M54
— Juhi Chawla (@iam_juhi) November 11, 2020
अभिनेत्री जुही चावला नुकतीच यूएईवरुन परतली आहे. आयपीएलमध्ये केकेआरला पाठिंबा देण्यासाठी गेली होती. भारतात परत येताना विमानतळावर तिला हा अनुभव आला. जुहीने शेअर केलेला व्हिडीओ आत्तापर्यंत 82 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. आता जुहीच्या या व्हिडीओनंतर सरकार काही पावलं उचलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.