अलिया भटला स्टेजवरच कोसळलं रडू, नक्की झालं तरी काय; पाहा VIDEO

अलिया भटला स्टेजवरच कोसळलं रडू, नक्की झालं तरी काय; पाहा VIDEO

नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आलिया ओक्शीबोक्शी रडताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 2 डिसेंबर : अभिनेत्री आलिया भट मागच्या काही काळापासून तिच्या आगामी सिनेमा आणि रणबीर कपूरसोबतच्या रिलेशिपमुळे चर्चेत आहे. पण नुकताच आलियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती ओक्शीबोक्शी रडताना दिसत आहे. आलियाच्या बाजूला तिची बहीण शाहीन भट बसलेली दिसत आहे. ती आलियाला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र आलियाचं रडू काही थांबण्याची चिन्ह दिसत नाही. पण असं नक्की काय घडलं ज्यामुळे आलिया असं रडू कोसळलं.

आलिया भटनं नुकतीच शाहीनसोबत मुंबईतील एका वुमन सेमिनारमध्ये हजेरी लावली. यावेळी एका मुद्द्यावर बोलताना तिला तिचे अश्रू रोखता आले नाहीत. या कार्यक्रमात आलिया तिच्या बहिणीच्या डिप्रेशनबद्दल बोलत होती. पण बोलता-बोलता आलियाला अचानक रडू कोसळलं. आलियाला रडताना पाहिल्यावर शाहीन लगेच तिच्याजवळ गेली आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करु लागली मात्र तरीही आलिया रडत राहिली.

दिग्दर्शक विजू माने थोडक्यात बचावले, ठाणे मनपाचा भोंगळ कारभार पुन्हा उघडकीस

 

View this post on Instagram

 

Emotional #AliaBhatt with sister #ShaheenBhatt for a women's seminar in Mumbai today #instadaily #ManavManglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

आलियाची बहीण शाहीन तिच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. वयाच्या 13 व्या वर्षी शाहीनला डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. त्यातून बाहेर आल्यानंतर तिनं ‘आय हॅव नेव्हर बी अनहॅप्पीयर’ (I Have Never Be Unhappy) एक पुस्तक लिहिलं. या कार्यक्रमात बोलताना आलियानं सांगितलं, ‘मी माझ्या बहिणीसोबत राहूनही तिचं पुस्तक वाचल्यानंतर तिच्या भावना नीट समजू शकले होते.’ आलिया तिच्या बहिणीबद्दल खूपच सेन्सिटीव्ह आहे. ही गोष्ट अनेकदा दिसून आली आहे.

Bigg Boss च्या घरात पॉर्नची मागणी, अभिनेत्रीची जीभ घसरली; पाहा VIDEO

View this post on Instagram

Now here’s that moment where I’m struggling to type that perfect birthday caption for my brilliant sisters birthday.. I type I cancel I type I cancel.. and the reason I do that is (well for starters I’m not a beautiful writer like her) but also cause we speak a language that would probably not make sense.. The relationship we share is a language that doesn’t exist.. except for in our eyes.. and toes okay and maybeeee our knees.. So anyway.. Sir.. You’re the sweetest artichoke the pudding of Naples has seen cause eventually we all just have to bobble our way through the heavens of sisterhood and I’m glad we’ve had the little nook of heaven with cats and aloo fry and tons of london! Happy birthday sweet carrot I hope we yoddle together for as long as we have arms and leggies :) Oh and happy birthday 😀🙂❤️

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

काही दिवसांपूर्वी आलियानं शाहीनच्या वाढदिवसाला तिच्यासाठी खूप गोड आणि भावूक मेसेज लिहिला होता. तिनं शाहीनचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. तिनं लिहिलं, मी माझ्या समजुतदार बहिणीसाठी एक परफेक्ट बर्थडे कॅप्शन लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. मी तिच्याप्रमाणे चांगली लेखिका नाही. पण जे नातं आमच्या दोघींमध्ये आहे. त्यात मात्र कोणतीही भाषा नाही. फक्त आमचे डोळे आणि पाय बोलतात, कदाचित ढोपरं सुद्धा. तर हां तू जगातली सर्वात प्रेमळ बहीण आहेस आणि मी खूप आनंदी आहे की, आपल्या मांजरी, बटाटा फ्राय आणि खूप साऱ्या लंडन शेड्ससोबत आपला स्वतःचा एक वेगळा स्वर्ग आहे.

सलमान खान करणार स्वतःहून 29 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2019 04:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading