शिक्षकाचा 'फेसबुक' आयडी हॅक करून मित्र आणि नातेवाईकांकडे केली 'ही' डिमांड

शिक्षकाचा 'फेसबुक' आयडी हॅक करून मित्र आणि नातेवाईकांकडे केली 'ही' डिमांड

'फेसबुक' आयडी हॅक करून आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

कॅथल,26 जानेवारी: 'फेसबुक' आयडी हॅक करून आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. चंदाना येथील शिक्षक राजपाल शर्मा यांचा फेसबुक आयडी हॅक करून त्यांच्या 20 पेक्षा जास्त नातेवाईक आणि मित्रांना मेसेज पाठवण्यात आले. राजपाल शर्मा हे आयसीयूमध्ये दाखल असून त्यांना 10 ते 20 हजार रुपयांची मदत करा, असा उल्ले मेसेजमध्ये करण्यात आला होता.

राजपाल शर्मा यांना अनेक मित्रांचे फोन आल्यानंतर ही बाब समोर आली. राजपाल शर्मा यांनी खुलासा केला की, ते आयसीयूमध्ये दाखल नसून त्यांनी फेसबूकवरून कोणतीही मदत मागितलेली नाही. यानंतर राजपाल शर्मा यांनी फेसबूकचा पासवर्ड बदलून एक पोस्ट करून आपल्या मित्रांना झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.

शिक्षक राजपाल शर्मा यांनी सांगितले की, त्यांचा फेसबुक आयडी हॅक झाल्यानंतर त्यांनी पासवर्ड बदलला आणि ते लॉग आऊट झाले. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी हॅकर्सने राजपाल यांच्या 20 पेक्षा जास्त मित्र आणि नातेवाईकांना मेसेज पाठवून हॅकर्सने पैशाची डिमांड केली. यानंतर रामपाल यांनी 100 नंबर डायल करून फोन करून तितरम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोसिलांना संपूर्ण माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना फेसबुक आयडी लॉग आऊट करून मित्रांना माहिती देण्याचा सल्ला दिला.

सावधान! आयडी हॅक करून चॅटिंगच्या आधारावर गंडवताहेत हॅकर...

तुमचे फेसबुकवर अकाऊंट असेल तर सावधान! हॅकर्स आयडी हॅक करून चॅटिंगच्या आधारावर आर्थिक फसवणूक करत आहेत. हॅकर्स हाय, हॅलो असा मेसेज पाठवून थेट अर्जंट मदत मागतात. 10 ते 20 हजार रुपये पाठवण्याची मागणी करतात.

First published: January 26, 2020, 8:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading