बहिणीच्या छेडछाडीला विरोध केल्याने भावाची हत्या

बहिणीच्या छेडछाडीला विरोध केल्याने भावाची हत्या

तिच्या भावाने याबद्दल त्या तरुणाला अनेकदा सांगून पाहिले आणि दमही दिली होता. याचा राग त्या तरुणाला आला होता.

  • Share this:

मुंबई 28 जानेवारी : बहिणीच्या छेडछाडीला विरोध केल्याने मुंबई एका तरुणाची हत्या करण्यात आलीय. मुंबईतल्या अग्निपाड्यात ही खळबळजनक घटना घडलीय. पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. त्याच्याविरुद्ध 302,323,504 या कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आलाय. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून गुंडगीरी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी होतेय. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी हा मुलीला त्रास देत होता. त्या त्रासाला कंटाळून तिने अनेकदा त्याची तक्रारही केली होती. मात्र त्या तरूणाचा त्रास काही थांबला नाही.

बहिणीने हा प्रकार आपल्या भावालाही सांगितला होता. तिच्या भावाने याबद्दल त्या तरुणाला अनेकदा सांगून पाहिले आणि दमही दिली होता. याचा राग त्या तरुणाला आला होता. त्याच रागातून धार धार शस्त्रांनी त्याने मुलीच्या भावाची हत्या केली.

महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराच्या विरोधातले खटले वेगाने निकाली निघावेत आणि आरोपीला कठोर शिक्षा होऊन असे प्रकार करणाऱ्यांवर जरब बसावी, यासाठी कठोर कायदा करण्याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. मंत्रालयात यासंदर्भात विधि व न्याय विभाग आणि गृह विभागाच्या अधिकाऱ्यांची काही दिवसांपूर्वीच बैठक झाली.

NIA ची टीम रिकाम्या हाती माघारी परतली, राज्य सरकार घेणार मोठा निर्णय

महिला व बालकांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत असून अशा प्रकरणांमधील आरोपींना वेळेत आणि कठोर शिक्षा झाल्यास अशा प्रकारांना आळा बसेल, असा मतप्रवाह आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही अनेक आमदारांनी महिला अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली होती.

मिलिंद देवरांच्या पत्रामुळे खळबळ, काँग्रेसच्या मंत्र्यांची सोनियांकडे तक्रार

त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकरणांमधील तपासात कशा प्रकारे सुधारणा करता येईल, कमीत कमी वेळेत खटले कसे निकाली काढता येतील, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल, यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2020 11:00 AM IST

ताज्या बातम्या