भयंकर! छळाला कंटाळून सुनेनं केली सासूची हत्या; मृतदेहाचे डोळे काढले, बोटं कापली आणि त्यानंतर...

भयंकर! छळाला कंटाळून सुनेनं केली सासूची हत्या; मृतदेहाचे डोळे काढले, बोटं कापली आणि त्यानंतर...

सासू आणि सुनेच्या नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना उघड झाली आहे. या प्रकरणात सुनेनं सासूची हत्या (Brutal Murder) केली. या हत्येनंतर स्वत:ला जाळून घेतलं.

  • Share this:

पाटणा, 27 जानेवारी:  सासू आणि सुनेच्या नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना उघड झाली आहे. या प्रकरणात सुनेनं सासूची हत्या ((Brutal Murder) केली. या हत्येनंतर स्वत:ला जाळून घेतलं. आगीच्या ज्वालांमध्ये वेढलेली ही महिला जेंव्हा घराच्या बाहेर आली तेंव्हा त्या परिसरातील लोकांना मोठा धक्का बसला. या महिलेला आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

बिहारची (Bihar) राजधानी पाटणा (Patana) मधील ही संपूर्ण घटना आहे. या प्रकरणातील आरोपी आरती देवी हिनं सुरुवातीला तिची सासू धर्मशीला देवीची हत्या केली. या हत्येनंतरही तिचं समाधान झालं नाही. तिनं सासूचे डोळे काढले तसंच हाताची बोटं देखील कापली. या निर्घुण प्रकारावरच आरती थांबली नाही. तिनं स्वत:लाही जाळून घेतलं. या प्रकरणाची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला आहे.

हत्येचं कारण काय?

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार आरतीचे सासरे राजकुमार साव आणि सासू धर्मशीला देवी हे दोघं तिला कायम मारहाण करत असत. या कारणामुळे आरतीनं सासूची हत्या केली. आरतीचा सासूबद्दलचा तिरस्कार इतक्या टोकाचा होता की, तिचं हत्येवर समाधान झालं नाही. तिनं सासूच्या मृतदेहाची विटंबना केली. त्यानंतर या हत्येनंतर नैराश्यामध्ये तिने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

(हे वाचा-धक्कादायक! प्रेमाचं रहस्य लपवण्यासाठी मुलीनं प्रियकरासोबत उचललं हे भयानक पाऊल)

आरतीनं स्वत:ला जाळून घेतलेलं पाहताच परिसरातल्या नागरिकांनी तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. ही घटना घडली त्या दिवशी सकाळी सासू आणि सुनेचं भांडण झालं होतं, त्यानंतर सुनेनं ही हत्या केली अशी माहिती आहे. सून घराच्या बाहेर आल्यानंतर या प्रकरणाची सर्वांना माहिती झाली.

Published by: News18 Desk
First published: January 27, 2021, 11:58 AM IST

ताज्या बातम्या