Shocking VIDEO: Remdesivir इंजेक्शनसाठी भलीमोठी रांग, मेडिकल समोरील व्हिडीओ व्हायरल

Shocking VIDEO: Remdesivir इंजेक्शनसाठी भलीमोठी रांग, मेडिकल समोरील व्हिडीओ व्हायरल

Remdesivir injection shortage: कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा अनेक ठिकाणी भासत असल्याचं समोर आलं आहे. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • Share this:

इंदूर, 7 एप्रिल : कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) संपूर्ण देशभरात वेगाने होत असल्याचं दिसत आहे. बाधितांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत रेमडिसिवीर इंजेक्शन (Remdesivir injection)ची मागणीही वाढत आहे. मात्र, याचवेळी अनेक ठिकाणी रेमडिसिवीर औषधांचा तुटवडा (shortage of Remdesivir injection) भासत असून काही ठिकाणी चढ्या दराने औषधांची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. त्यातच आता मध्यप्रदेशातील इंदूर (Indore) येथून एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो परिस्थिती किती भयावह आहे हे दर्शवतो.

रेमडिसिवीर इंजेक्शनसाठी मध्यप्रदेशातील इंदूर येथे हाहाकार माजला आहे. रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. ज्या ठिकाणी इंजेक्शन उपलब्ध आहे त्या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्याचं पहायला मिळत आहे. इंदूरमधून समोर आलेला व्हिडीओ तेथील भयंकर परिस्थिती दर्शवत आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, कोरोना बाधित रुग्णांचे नातेवाईक एका मेडिकलच्या बाहेर रेमडिसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी गर्दी करुन उभे आहेत. ही इतकी भली मोठी गर्दी केल्याने या नागरिकांनाच कोरोना होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण झाल्याने औषधी कंपन्यांनी आपल्या उत्पादनात काहीशी घट केली होती. त्यानंतर आता अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने रेमडिसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत रेमडिसिवीर औषधांचा तुटवडा भासत आहे. महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात येथून रेमडिसिवीर औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.

कोविशिल्ड कशी ठरतेय संजीवनी? आदर पूनावाला यांनी सांगितलं कोरोना लशीचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यं

इंदूरमधून मोठी मागणी

मध्यप्रदेशात दररोज 700 हून अधिक कोरोना बाधितांची नोंद होत आहे. कोरोनाचा संसर्ग दर हा सुद्धा 16 टक्क्यांवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत इंदूर जिल्ह्यातून दररोज पाच ते सहा हजार रेमडिसिवीर इंजेक्शनची मागणी होऊ लागली आहे.

महाराष्ट्रातही चढ्या दराने विक्री

महाराष्ट्रातही रेमडिसिवीर इंजेक्शन जास्त किमतीने विक्री होत असल्याचं वास्तव न्यूज 18 लोकमतने दाखवलं. यानंतर याची दखल शासनाने घेत किमती कमी करण्याचं आश्वासन दिलं आहे. कोरोना बाधित रुग्णांसाठी उपयोगी असलेल्या रेमडिसिवीर इंजेक्शनचा पुरवठा पर्याप्त व्हावा, कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं, "कोविडच्या वाढत्या संसर्गात रेमडिसिवीर संदर्भात परवा बैठक घेतली. काही कंपन्यांचे दर 800 रुपयांच्या घरात आहेत तर काही कंपन्यांचे दर जास्त आहेत. येत्या दोन तीन दिवसांत म्हणजे गुरुवार किंवा शुक्रवारपर्यंत सर्व रेमडिसिवीरच्या किमती 1300 रुपयांपर्यंत आम्ही करु. रेमडिसीवर बनविणाऱ्या सर्व कंपन्यांच्या किमती या समान असाव्या यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे."

Published by: Sunil Desale
First published: April 7, 2021, 8:17 PM IST

ताज्या बातम्या