Astrazeneca कोरोना लशीमुळेच रक्ताच्या गुठळ्या होत आहेत का? EU Drug Regulator ने दिली महत्त्वाची माहिती

Astrazeneca कोरोना लशीमुळेच रक्ताच्या गुठळ्या होत आहेत का? EU Drug Regulator ने दिली महत्त्वाची माहिती

अॅस्ट्राझेनकाची कोरोना लस (Astrazeneca corona vaccine) घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या (Blood clots) झालेल्या 7 जणांचा मृत्यूही झाला आहे.

  • Share this:

ब्रिटन, 07 एप्रिल : ऑक्सफोर्ड -अ‍ॅस्ट्राझेन्काची (Oxford-Astrazenca) लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या (Blood Clots) झालेल्या 30 पैकी 7 जणांचा मृत्यू झाल्याचं यूकेतील वैद्यकीय नियामकांनी सांगितलं  आहे. अ‍ॅस्ट्राझेन्काची लस आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याची संभाव्य शक्यता पाहता अनेक युरोपियन राष्ट्रांनी (European Countries) या लशीचा वापर तात्पुरता थांबवला आहे. दरम्यान आया युरोपियन ड्रग्ज नियामकांनीहीदेखील अॅस्ट्राझेनकाची कोरोना लस आणि रक्ताच्या गुठळ्या होणं यामध्ये संंबंध असण्याची शक्यता वर्तवली आहे.

द यूकेज मेडिसीन्स अँड हेल्थकेअर प्रोडक्टस रेग्युलेटरी एजन्सीच्या (MHRA) म्हणण्यानुसार, 24 मार्चपर्यंत आलेल्या अहवालानुसार 30 पैकी  7 जणांचा मृत्यू झाला आहे. थ्रोम्बोसिसचे अहवाल वैद्यकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सरकारी संकेतस्थळाच्या माध्यमातून सादर केले आहेत.

देशात लशीचे 18.1 दशलक्ष डोस दिल्यानंतर हे थ्रोम्बोसिसचे (Thrombosis) अहवाल आलेले आहेत. ही लस घेतल्यानंतर यापैकी बहुतांश म्हणजेच 22 केसेसमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा दुर्मिळ प्रकार समोर आला असून, त्याला सेलेब्रल व्हेनस सायनस थ्रोम्बोसिस असं म्हणतात. अन्य 8 केसेसमध्ये थ्रोम्बोसिससोबत रक्तातील प्लेटलेट (Platelet) काऊंट घटल्याचं दिसून आलं आहे.  फायझर- बायोएनटेकची लस घेतलेल्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याची तक्रार दिसून आलेली नसल्याचं यूकेने सांगितलं.

हे वाचा - कोविशिल्ड कशी ठरतेय 'संजीवनी'? आदर पूनावाला यांनी सांगितलं वैशिष्ट्य

तर  EU’s drug regulator ने सांगितलं की, अॅस्ट्राझेनकाची कोरोना लस आणि रक्ताच्या गुठळ्या होणं या संबंध असू शकतो. पण त्याच्या दुष्परिणामापेक्षा फायदे जास्त असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

 EMA च्यानुसार 60 पेक्षा कमी वयाच्या महिलांमध्ये लसीकरणानंतर दोन आठवड्यात अशी प्रकरणं बहुतेक दिसत आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार नेमका धोका किती आहे हे स्पष्ट होत नाही. युरोप आणि यूकेतील जवळपास 25 दशलक्ष लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. इथूनच ही प्रकरणं येत आहेत. त्यामुळे इथल्या प्रकरणांचा तज्ज्ञ सध्या अभ्यास करत आहेत.

एमएचआर आणि युरोपियन मेडिकल एजन्सी या दोघांच्या म्हणण्यानुसार, रक्ताच्या गुठळीची समस्या आणि अ‍ॅस्ट्राझेन्काची लस यांच्यातील परस्पर संबंध अजूनही दृष्टीक्षेपात आलेला नाही. परंतु वाढत्या चिंताजनक स्थितीमुळे अनेक देशांमध्ये लसीकरण तात्पुरते थांबवण्याचा आणि तरुण वयातील व्यक्तींमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या बघता केवळ वयस्कर व्यक्तींनाच लस देणं मर्यादित ठेवलं आहे.

नेदरलॅंण्डने शुक्रवारी अ‍ॅस्ट्राझेन्काची लस 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना देणे थांबवले आहे. कारण पाच अल्पवयीन महिलांमध्ये रक्ताच्या गुठळीची समस्या दिसून आली आणि त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. जर्मनीत देखील रक्ताच्या गुठळ्या झाल्याच्या 31 केसेस आढळून आल्या आहेत. यात अल्प व मध्यम वयीन स्त्रियांचा समावेश आहे. त्यामुळे 60 वर्षांखालील व्यक्तींचे लसीकरण तातडीने तात्पुरते थांबवण्यात आले आहे. फ्रान्समध्ये देखील अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला असून,डेन्मार्क,नॉर्वेमध्ये सर्व वयोगटांतील व्यक्तींना लस देणे थांबवण्यात आले आहे.

हे वाचा - आता तुमच्या ऑफिसमध्येच तुम्हाला मिळणार कोरोना लस; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यापूर्वीच अ‍ॅस्ट्राझेन्काची लस सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे 7 एप्रिलपूर्वी त्यांनी अद्यायावत सल्ला जाहिर करणं अपेक्षित असल्याचं दि युरोपियन मेडिसीन एजन्सीनं म्हटलं आहे. याबाबत त्यांनी बुधवारी सांगितले की,जगभरात सेलेब्रल व्हेनस सायनस थ्रोम्बोसिसच्या 62 केसेस आढळून आल्या आहेत. त्यापैकी 44 केसेस या युरोपियन अर्थिक क्षेत्रातील आहेत. या क्षेत्रात युरोपियन युनियन,आईसलॅण्ड,लिचेंस्टाईन आणि नॉर्वेचा समावेश होतो. तथापि या आकडेवारीत जर्मनीतील सर्व केसेसचा समावेश नाही. या प्रदेशात 9.2 दशलक्षाहून अधिक अ‍ॅस्ट्राझेन्का लसीचे डोस दिले गेले आहेत. ही लस सुरक्षित असून तज्ज्ञांना वय,लिंग किंवा वैद्यकीय इतिहास यासारखे कोणतेही जोखमीचे घटक आढळून आलेले नसल्याचे ईएमएने म्हटलं आहे.

ब्रिटनमधील पूर्व आंग्लिया विद्यापीठातील वैद्यकीय सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ पॉल हंटर यांनी एएफपीशी बोलताना सांगितलं की, लसीकरण आणि रक्ताच्या गुठळ्या यांच्यातील दुवा म्हणजे कदाचित रॅण्डम असोसिएशन असण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या देशातील क्लस्टर्समधील पुराव्यांपैकी बहुतांश पुरावे हे प्रतिकूल घटनांचे कारण असलेल्या अ‍ॅस्ट्राझेन्का लशीच्या बाजूने आहेत. तथापि लसीकरण न झालेल्यांना कोविडमुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे.

एमएचआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जून राईन यांनी फायदा हा कोणत्याही जोखमीपेक्षा अधिक असल्याचं स्पष्ट केलं. जेव्हा लोकांना बोलावले जाईल तेव्हा त्यांनी लसीकरण करून घ्यावं,असं आवाहन त्यांनी केलं.

हे वाचा - तुम्ही लोकांचा जीव धोक्यात घालताय, केंद्रीय आरोग्यमंत्री राज्य सरकारवर भडकले

अ‍ॅस्ट्राझेन्काच्या प्रतिनिधींनी एएफपीशी बोलताना सांगितले की, रुग्णांच्या सुरक्षेला आम्ही प्रथम प्राधान्य देतो. गेल्या महिन्यात अमेरिकेतील क्लिनिकल चाचण्यांनंतर अ‍ॅस्ट्राझेन्काने म्हटले आहे की ही लस या आजारापासून बचाव करण्यासाठी 76 टक्के प्रभावी आहे.परंतु युरोपियन युनियन आणि यूकेच्या आकडेवारीनुसार रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढल्याचेही दिसून आले आहे. यूके,ईयू आणि डब्ल्यूएचओ अशा संस्थांनी असा निष्कर्ष काढला आहे की सर्व वयोगटातील व्यक्तींना याचा जोखमीपेक्षा फायदाच अधिक आहे.

First published: April 7, 2021, 9:30 PM IST

ताज्या बातम्या