खळबळजनक! एक-दोन नव्हे तर दिले लशीचे सहा डोस, महिलेच्या तब्येतीवर काय परिणाम झाला?

खळबळजनक! एक-दोन नव्हे तर दिले लशीचे सहा डोस, महिलेच्या तब्येतीवर काय परिणाम झाला?

Coronavirus Vaccine: इटलीमधून एक अजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका महिलेला एका वेळी चुकून एक-दोन नव्हे तब्बल सहा डोस दिले गेले.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मे: कोरोना संसर्गाने जगभर धुमाकूळ घातल्यानंतर त्याला नियंत्रणात आणण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान सध्यातरी लसीकरण हाच त्याच्या नियंत्रणासाठीचा प्रभावी उपचार आहे. वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या कंपन्यांनी विकसित केलेल्या लशींचं (Corona Vaccines) हळूहळू वितरण होऊ लागलं आहे. त्यासाठी लसीकरण मोहीम आयोजित केली जात आहेत. भारतासह अनेक देशांत अद्याप लशींचा तुटवडा (Vaccine Shortage) आहे. त्यात नियोजनाचा अभाव असल्यामुळे लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दीही होत आहे. भारतात लशीचा पहिला डोस मिळवण्यासाठीही लोकांना बरीच धडपड करावी लागत आहे. पण इटलीमधून एक अजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका महिलेला एका वेळी चुकून एक-दोन नव्हे तब्बल सहा डोस दिले गेले. सुदैवाने तिच्यावर काही साइड इफेक्ट (Side Effects) झाले नाहीत; मात्र याप्रकरणी स्थानिक प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

मध्य इटलीतल्या (Central Italy) टस्कनीमधल्या नोआ हॉस्पिटलमध्ये एका 23 वर्षीय महिलेला फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) कंपनीच्या लशीचे सहा डोस एकदम दिले गेले. लशीच्या एका व्हायलमध्ये (Vial) सहा डोस असतात. ते डोस वेगवेगळ्या सहा लोकांना देणं अपेक्षित असतं, मात्र लस देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याकडून व्हायलमधलं सगळं औषध चुकून इंजेक्शनमध्ये एकाच वेळी भरलं गेलं आणि ते पूर्ण इंजेक्शन तसंच त्या महिलेला दिलं गेलं. इंजेक्शन देऊन झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला आपली चूक लक्षात आली. लगेचच त्या कर्मचाऱ्याने संबंधित महिलेला याबाबत माहिती दिली.

हे वाचा-Good News: 2 ते 18 वयोगटाला मिळणार Covaxin ही लस? तज्ज्ञांच्या टीमची शिफारस

त्या महिलेवर या सहा डोसेसचे साइड इफेक्ट्स होतील, या भीतीने तिला 24 तास हॉस्पिटलमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात लस तिच्या शरीरात गेल्यामुळे अँटीबॉडीजवर (Antibodies) काय परिणाम होतो, हे डॉक्टरांनी तपासलं. सुदैवाने तिच्यावर कोणतेही विपरीत परिणाम झाल्याचं आढळलं नाही. त्यामुळे 24 तासांनंतर तिला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं. ही घटना चुकून झाली असल्याचं स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनकडून देण्यात आलं आहे. शिवाय या घटनेच्या अंतर्गत चौकशीचे आदेशदेण्यात आले आहेत,असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

हे वाचा-कितीही रूपं बदलू दे; कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिएंट्ससाठी प्रभावी लस तयार

इटलीमध्ये एप्रिलच्या सुरुवतीपासूनच आरोग्य कर्मचाऱ्यांना (Health Workers) लसीकरण बंधनकारक करण्यात आलं आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने लस घेण्यास नकार दिला, तर त्याला कोरोना रुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये ड्युटी दिली जात नाही. त्यामुळे एकंदरीत लसीकरण कार्यक्रमाला तिथे वेग आला आहे.

First published: May 12, 2021, 11:50 AM IST

ताज्या बातम्या