नवी दिल्ली, 7 एप्रिल: 'परीक्षा पे चर्चा' (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देशातील विद्यार्थी (Interaction with Students), पालक (Parents) आणि शिक्षकांसोबत संवाद साधणार आहेत. आज (7 एप्रिल) सायंकाळी 7 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन माध्यमातून संवाद साधणार आहेत. याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन दिली आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा हा चौथा भाग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं, आमच्या शूर परीक्षा योद्धा, पालक आणि शिक्षकांसोबत विविध विषयांवर अनेक मजेदार प्रश्न आणि संस्मरणीय चर्चा. 7 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता, परीक्षा पे चर्चा #PPC2021.
The first ever virtual #PPC2021 is going to be an exciting interaction, covering a diverse range of topics. You could be an #ExamWarrior, a parent or a teacher...there’s something for everyone.
Let us make exams stress free!
Watch tonight at 7 PM. pic.twitter.com/Sdu7dS7DSl
— Narendra Modi (@narendramodi) April 7, 2021
कोरोनामुळे यंदा ऑनलाईन संवाद
2018 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक, शिक्षकांसोबत संवाद साधत आहेत. पहिल्यांदा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये झालं होतं.
हे पण वाचा: मोठी बातमी! शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा तिसऱ्यांदा स्थगित
मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमासाठी 12 लाखांहून अधिक नोंदणी
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी कशी करावी, ताण-तणाव कसा दूर करावा यासंदर्भात महत्वाच्या सूचना देतात. परीक्षा पे चर्चा 2021 या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशनची सुविधा 14 मार्च 2021 पर्यंत पूर्ण झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परीक्षा पे चर्चा 2021 या कार्यक्रमासाठी 12 लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे. ज्यामध्ये 9 लाखांहून अधिक विद्यार्थी, 2 लाखांहून अधिक शिक्षक आणि एक लाखांहून अधिक पालकांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
परीक्षा पे चर्चा 2021 या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण हे डीडी नॅशनल, डीडी न्यूज , डीडी सह्याद्री या वाहिन्यांवर उपलब्ध असणार आहे. डीडी सह्याद्री वाहिनीवर हा कार्यक्रम मराठी भाषेत उपलब्ध असणार आहे. यासोबतच इतर प्रादेशिक भाषांमध्येही या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जाणार आहे.