महाराष्ट्र बोर्डाचा 12 वी चा निकाल उद्या लागणार?, आज तारीख जाहीर होण्याची शक्यता
Maharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल जुलै महिन्यातच जाहीर होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण मंडळानं सांगितलं आहे. आता जुलै महिना संपायला उद्याच एकच दिवस बाकी आहे.
Maharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल जुलै महिन्यातच जाहीर होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण मंडळानं सांगितलं आहे. आता जुलै महिना संपायला उद्याच एकच दिवस बाकी आहे.
मुंबई, 30 जुलै: काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC result 2021) राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आला. आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे (Maharashtra 12th result date) सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारावीचा निकाल जुलै महिन्यातच जाहीर होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण मंडळानं सांगितलं आहे. आता जुलै महिना संपायला उद्याच एकच दिवस बाकी आहे. त्यामुळे आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता (official announcement awaited) आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आज निकालाची तारीख जाहीर करु शकतं. 31 जुलैपर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं देशातल्या सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना दिलेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंडळाकडे आज आणि उद्याचा दिवस शिल्लक आहे. त्यानुसार 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता असून उद्या निकाल जाहीर केला जाऊ शकतो. (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education )
मोदींनी नितीन गडकरींवर सोपवली मोठी जबाबदारी, शरद पवारांच्या निवासस्थानी खलबतंपरीक्षा रद्द
यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Corona) दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा लागत आहे. बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र अखेर बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
12 वीच्या निकालाचं विशेष मूल्यांकन
दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं (Special Assessment system) लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसंच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.