JOB Alert : Serious Fraud Investigation ऑफिसमध्ये नोकरीची संधी; मिळेल भरघोस पगार

गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालय भरतीसाठी एकूण 66 जागा रिक्त आहेत. यासाठी वकीली शिकलेल्या तरुणांची गरज आहे.

गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालय भरतीसाठी एकूण 66 जागा रिक्त आहेत. यासाठी वकीली शिकलेल्या तरुणांची गरज आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 18 जून : गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालय (Serious Fraud Investigation Office Recruitment) भरती मार्फत भरतीची अधिसूचना करण्यात आली असून यंग प्रोफेशनल (लॉ), कनिष्ठ सल्लागार (Law), वरिष्ठ सल्लागार (Law). या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालय भरतीसाठी एकूण 66 जागा रिक्त आहेत. यासाठी वकीली शिकलेल्या तरुणांची गरज आहे. याआहेत जागा यंग प्रोफेशनल (लॉ) - एकूण जागा 13 कनिष्ठ सल्लागार (कायदा) - एकूण जागा 14 वरिष्ठ सल्लागार (कायदा) - एकूण जागा 39 शैक्षणिक पात्रता यंग प्रोफेशनल (लॉ) या पदासाठी कर्तव्यदक्ष एक कायदा पदवीधर असणं आवश्यक आहे.  उमेदवारांना एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.  तसंच कॉर्पोरेट कायद्याच्या क्षेत्रात इतर तपास यंत्रणांमध्ये आणि नियामक संस्थांमध्ये संपर्क असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. कनिष्ठ सल्लागार (कायदा) या पदासाठी कर्पोरेट कायद्याच्या क्षेत्रात इतर तपास यंत्रणेत आणि नियामक संस्थांमध्ये संपर्क असणं आवश्यक आहे. तसंच प्राधान्याने  3 ते 8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. हे वाचा - Online Job Interview द्यायचाय? जरा थांबा, आधी हे वाचा; जॉब तुम्हालाच मिळणार वरिष्ठ सल्लागार (कायदा) या पदासाठी मुख्यतः 8-15 वर्षांचा वकिलीचा अनुभव असावा. तसंच प्राथमिक तपास यंत्रणेत आणि नियामक संस्थांमध्ये, विशेषत: कॉर्पोरेट कायद्याच्या क्षेत्रात संपर्क असावा. इतका मिळणार पगार यंग प्रोफेशनल (लॉ) - 60,000 / – प्रती महिना कनिष्ठ सल्लागार (कायदा) - शैक्षणिक पात्रतेनुसार 80,000 ते 1,45,000 /- वरिष्ठ सल्लागार (कायदा) - शैक्षणिक पात्रतेनुसार 1,45,000 ते 2,65,000 /- अर्ज पाठविण्यासाठी पत्ता: – 2 रा मजला, परवान भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, दिल्ली 110003 नोकरीची ठिकाणं - दिल्ली / मुंबई / कोलकाता / चेन्नई / हैदराबाद
    Published by:Atharva Mahankal
    First published: