Elec-widget

रिझर्व्ह बँकेत नोकरीची मोठी संधी, 'या' पदांसाठी करा अर्ज

रिझर्व्ह बँकेत नोकरीची मोठी संधी, 'या' पदांसाठी करा अर्ज

Reserve Bank, Jobs - तुम्हाला रिझर्व्ह बँकेत नोकरीसाठी कसा अर्ज करायचा ते पाहा

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : बँकेत नोकरीची चांगली संधी आहे. रिझर्व्ह बँकेत 199 जागा भरायच्या आहेत. ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM या पदांसाठी जागा भरायच्या आहेत.

पदं आणि पदसंख्या

ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल - 156

ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR - 20

ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM - 23

Loading...

सोनं-चांदी झालं स्वस्त, 'हे' आहेत शुक्रवारचे दर

शैक्षणिक पात्रता

ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल यासाठी  60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण हवेत.

ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR यासाठी अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह  PGDM/ MBA (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा तत्सम.

जुनं बँक अकाउंट बंद करताय? मग ही काळजी घ्यायलाच हवी

ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM यासाठी IIT-खडगपूरमधून सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी)/IIT-मुंबईमधून अप्लाइड सांख्यिकी आणि इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी  आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा  किंवा IIT कोलकाता, IIT खडगपूर आणि IIM कलकत्ता 55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा  किंवा तत्सम.

'या' व्यवसायासाठी मोदी सरकार करेल मदत, घरबसल्या होईल लाखोंची कमाई

आरक्षितांसाठी 50 टक्के हवेत.

वयाची अट - 1 सप्टेंबर 2019 रोजी वय 25 ते 30 वर्षापर्यंतच हवं. SC आणि ST ला 5 वर्ष सवलत आहे, तर OBC साठी 3 वर्ष सवलत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 ऑक्टोबर 2019. अधिक माहितीसाठी https://www.rbi.org.in/ इथे क्लिक करा.

अर्जाची फी सर्वसामान्यांसाठी 850 रुपये आणि आरक्षितांसाठी 100 रुपये आहे.

VIDEO : बाळा नांदगावकर म्हणाले, 'मनसेसैनिक सज्ज आहे', पण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 06:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...