देशसेवा करण्याचा गोल्डन चान्स; BSF मध्ये 'या' पदांसाठी होणार भरती; संधीचं करा सोनं

आता परीक्षा न देताही BSF मध्ये पदभरती होणार आहे.

आता परीक्षा न देताही BSF मध्ये पदभरती होणार आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली , 18 जून : अनेक तरुण देशसेवा करण्याची इच्छा मनात बाळगून बॉर्डर सेक्युरिटी फोर्स (BSF) मध्ये जाण्याचा विचार करत असतात. मात्र अनेक कारणांमुळे त्यांना जाण्याची संधी मिळत नाही. मात्र आता परीक्षा न देताही BSF मध्ये पदभरती होणार आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) भरतीमार्फत अधिसूचना जरी करण्यात आली आहे. यात विशेषज्ञ आणि सामान्य शुल्क वैद्यकीय अधिकारी. या पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत. सीमा सुरक्षा दल भरतीसाठी एकूण 89 रिक्त जागा रिक्त आहेत. या आहेत जागा विशेतज्ञ (Specialist) - एकूण जागा 27 सामान्य शुल्क वैद्यकीय अधिकारी (General Duty Medical Officer) - एकूण जागा 62 हे वाचा - नोकरी करताना शिक्षण सुरु ठेवायचंय? या आहेत टॉप डिस्टन्स लर्निंग युनिव्हर्सिटीज शैक्षणिक पात्रता विशेतज्ञ (Specialist) या पदासाठी वैद्यकीय पदवी किंवा डिप्लोमाबरोबर एक वर्षाचा अनुभव असणंही आवश्यक आहे. सामान्य शुल्क वैद्यकीय अधिकारी (General Duty Medical Officer) या पदासाठी MBBS च्या पदवीसह इंटर्नशिप आणि अनुभव आवश्यक आहे. दरमहा भत्ता विशेतज्ञ (Specialist) - 87,000/- रुपये सामान्य शुल्क वैद्यकीय अधिकारी (General Duty Medical Officer) - 75,000/- रुपये मुलाखतीचं तारीख आणि ठिकाण - 21 जून 2021 ते 30 जून 2021, बीएसएफ कंपोझिट हॉस्पिटल सविस्तर नोटिफिकेशन वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: