• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Maharashtra FYJC CET 2021: तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेली रजिस्ट्रेशन साईट आजपासून होणार पुन्हा सुरु

Maharashtra FYJC CET 2021: तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेली रजिस्ट्रेशन साईट आजपासून होणार पुन्हा सुरु

FYJC CET 2021 Registration: अकरावीच्या (11th Admissions) प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया (CET Registration process)20 जुलैपासून सुरु करण्यात आली. मात्र सीईटीचं रजिस्ट्रर पोर्टल काही तांत्रिक बिघाडामुळे आतापर्यंत बंद होतं.

  • Share this:
    मुंबई, 26 जुलै: दहावीचा निकाल (10th Result) लागल्यानंतर अकरावीच्या (11th Admissions) प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया (CET Registration process) 20 जुलैपासून सुरु करण्यात आली. मात्र सीईटीचं रजिस्ट्रर पोर्टल काही तांत्रिक बिघाडामुळे आतापर्यंत बंद होतं. दरम्यान आजपासून हे पोर्टल पुन्हा सुरु होत आहे. (FYJC CET 2021 Registration site reopen today) आज दुपारी तीनपासून हे पोर्टल सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी पुन्हा नोंदणी प्रक्रिया सुरु करु शकणार आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थी 2 ऑगस्टपर्यंत सीईटीसाठी नोंदणी करु शकतील. ज्या विद्यार्थ्यांनी आधीच नोंदणी केली आहे. त्यांना सीईटी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी केवळ त्यांचा अॅप्लिकेशन फॉर्म क्रमांक वापरण्याची आवश्यकता असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. अकरावीमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी CET परीक्षा 21 ऑगस्ट 2021 ला सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन असल्यामुळे परीक्षाकेंद्रांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. म्हणून चार दिवसांनंतर थांबवली तळीये गावातील शोध मोहिम परीक्षेसाठी कसं कराल रजिस्ट्रेशन? http://cet.mh-ssc.ac.in/ वर महाराष्ट्र CET 2021 ची अधिकृत वेबसाइट ओपन करा. . ड्रॉप डाउन मेनूमधून 'बोर्ड टाईप' (Board Type) निवडा. नाव, संपर्क क्रमांक (Contact detail), जन्म तारीख, पत्ता आणि शिक्षणाचं माध्यम (Medium of Education) यासारख्या नोंदणीसाठी आवश्यक सर्व माहिती भरा. त्यानंतर जिल्हा आणि तालुका निवडून परीक्षा केंद्राची माहिती (examination centers list) निवडा. फोटो, स्वाक्षरी (Sign), आयडी प्रूफ (ID proof) आणि काही असल्यास अपंग पुरावा अपलोड करा. इतर सर्व औपचारिकता पूर्ण करा आणि सबमिट वर क्लिक करा. भविष्यातील संदर्भासाठी अप्लिकेशनचं एक प्रिंट आउट घ्या. किती असेल परीक्षा शुल्क? या परीक्षेसाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याची गरज पडणार नाहीये. मात्र इतर बोर्डातरील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचं शुल्क 178 रुपये असणार आहे. काँग्रेसला धक्का, महाराष्ट्र काँग्रेस उपाध्यक्षांचं कोरोनानं निधन कोणासाठी असणार परीक्षा? CET म्हणजेच अकरावीची प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जुनिअर कॉलेजमध्ये (Junior College) प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासठी ही परीक्षा असणार आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published: