• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • CBSE Board Result 2021: 'या' शाळांचा निकाल थांबवणार CBSE; विद्यार्थ्यांना द्यावी लागणार परीक्षा

CBSE Board Result 2021: 'या' शाळांचा निकाल थांबवणार CBSE; विद्यार्थ्यांना द्यावी लागणार परीक्षा

अशा शाळांना अडचणी येण्याची शक्यता आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 27 जुलै: बहुप्रतीक्षित CBSE दहावी आणि बारावीचे निकाल (CBSE 10th 12th result 2021) लवकरच जाहीर होणार आहेत. विद्यार्थी आणि पालकही या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. CBSE नं शाळांना 25 जुलैपर्यंत मूल्यांकनाची (Assessment) संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ दिली होती. त्यामुळे CBSE चा निकाल याच आठवड्यात जाहीर (CBSE result 2021 Date) होण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही काही शाळांकडून मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये दिरंगाई होत आहे असं लक्षात आलंय. त्यामुळे अशा शाळांना आणि विद्यार्थ्यांना अडचणी येण्याची शक्यता आहे. विविध माध्यमांच्या अहवालानुसार, ज्या शाळांनी अद्याप डेटा अपलोड केला नाही अशा शाळांचा निकाल CBSE बोर्डाकडून थांबवण्यात येऊ शकतो. 23 जुलै 2021 रोजी अनेक शाळांना CBSEनं  निकाल सुधारित करण्यास सांगितलं. तसंच बर्‍याच शाळांनी विद्यार्थ्यांचे गुण उच्च श्रेणीत (High scores) टाकले होते, जे एकूण निकाल खराब करत होते. म्हणून अशा सर्व शाळांना आकडेवारीत सुधारणा करण्यास सांगण्यात आलं. हे वाचा -  CBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा तसंच बारावीचा निकाल (CBSE 12th result 2021) देखील जवळजवळ तयार झाला आहे. CBSE च्या म्हणण्यानुसार, ज्या शाळांच्या गुणांमध्ये विसंगती आहे त्यांचे निकाल रोखले जातील आणि नंतर जाहीर केले जातील. CBSE 10वीचा निकाल (CBSE 10th Result 2021) तयार आहे आणि अंतिम छाननीनंतर तो जाहीर होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार परीक्षा CBSE नं खासगी विद्यार्थ्यांच्या (Private Students) परीक्षेचं वेळापत्रकही जाहीर केलं आहे. अंतर्गत मूल्यांकनानुसार दहावी आणि बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा निकाल बोर्ड जाहीर करेल. तर खासगी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. खासगी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2021 या कालावधीत घेण्यात येईल. या विद्यार्थ्यांचे निकाल लवकरच जाहीर केले जातील.
    Published by:Atharva Mahankal
    First published: